Tiger vs Cobra
किंग कोब्रा हा जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. याच्या विषाने भलामोठा ताकदवान गडीदेखील क्षणार्धात मृत्यूच्या तोंडी जाऊ शकतो. याला पाहताच अनेकजण चालू वाट बदलून दुसऱ्या वाटणे चालू लागतात, इतका जगाला त्याचा धाक आहे. एवढेच काय तर किंग कोब्राने दूरवरून जरी शिकाऱ्याला पाहिले तर तो लांबूनच त्याच्यावर विषाच्या पिचकाऱ्या मारू लागतो. म्हणूनच तर जंगलातील भलेमोठे प्राणीही याला घाबरून असतात.
आता हाच व्हायरल व्हिडिओ बघा यात किंग कोब्राला चक्क वाघ घाबरून पळत असल्याचे दिसत आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ज्याची निवड करण्यात आली असा बलाढ्य प्राणी चक्क एका कोब्राला घाबरताना दिसत आहे. व्हिडिओबद्दल बोलणे केले तर, हा व्हिडिओ भारतातील ताडोबा जंगातील असून अंधारी टायगर रिझर्वमध्ये सुधिर चारमोडे यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. यात दिसते की, वाघ जंगतालत फेरफटका मारत आहे मात्र अचानक त्याला समोर किंग कोब्रा दिसू लागतो. यानंतर वाघाने जे केले ते पाहून तुम्हालाही हसू फुटेल…
हेदेखील वाचा – OMG! एक वर्षांच्या चिमुरड्याने चावून चावून सापाला केले ठार, अवस्था पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का
वेळ पडली तर वाघ सिंहाशी सुद्धा दोन हात करू शकतो. पण कोब्रासमोर मात्र त्याला माघारच घ्यावी लागली. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल. खरंतर किंग कोब्रा ओढ्यातून आपल्या मार्गाला जात होता. मात्र वाघाला बघताच तो आपला फणा काढतो. मग काय होणार… सापाचा फणा पाहताच वाघ चलबिचल होतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी हळूहळू आपली पावले मागे घेतो. हे सर्व पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसेल. बाकी काहीही असो पण या दृश्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली किंग कोब्रासमोर बलाढ्य वाघाचेही काही चालत नाही.
Tiger vs Cobra pic.twitter.com/egPKUsyJTm
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) August 17, 2024
दरम्यान याचा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये Tiger vs Cobra असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला 6 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.