Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral

National Animal Killed Nation Bird : वाघाच्या शिकारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात त्याने मोराची शिकारी केल्याचे दिसते. यूजर्स आता या दृष्यांची चांगलीच मजा घेत असून ही तर आता राष्ट्रीय समस्या झाली अशा प्रतिक्रिया व्हिडिओला देत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2026 | 09:00 AM
राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वन्यजीव छायाचित्रकाराने कॅमेऱ्यात कैद केला जंगलातील दुर्मिळ क्षण.
  • राष्ट्रीय प्राण्याशी संबंधित हे दृश्य पाहून सोशल मीडियावर यूजर्समध्ये आश्चर्याची लाट.
  • व्हिडिओ उमरेड-करहंडला वन्यजीव अभयारण्यातील असल्याचा दावा केला जात आहे.
माणसाने कितीही प्राण्यांना राष्ट्रीय दर्जा दिला किंवा त्यांना मानवी सीमा आणि कायद्यांमध्ये बंदिस्त करायचा प्रयत्न केला तरी जंगलात मात्र जंगलाचाच कायदा चालतो. इथे जो शूरवीर त्याचीच सत्ता चालणार आणि तोच जंगलावर राज्यही करणार. कमकुवत प्राण्यांची इथे गय केली जात नाही आणि निश्चितच शिकाऱ्याच्या थाळीत त्यांचा मृतदेह सजवला जातो. अलिकडे जंगलाचा शिकारी आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ याच्या शिकारीचे दृष्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. ही शिकार त्याने साध्यासुधा प्राण्याची नाही तर भारताचा राष्ट्रीय पक्षी मानल्या जाणाऱ्या मोराची शिकार त्याने केलेली असते. हे दृष्य पाहताना मात्र फारच अजब वाटले. यूजर्सने आश्चर्य व्यक्त करत मोराची शिकार वाघाने केल्याचे पहिल्यांदाच पाहिले अशा स्वरुपात निरनिराळ्या प्रतिक्रिया व्हिडिओवर व्यक्त केल्या आहेत.

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

वन्यजीव छायाचित्रकार आणि कंटेंट क्रिएटर कस्तुरी रंगन यांनी आपल्या कॅमेरात हे दुर्मिळ क्षण कैद केले असून याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘द नेशनल एनिमल हंट्स द नेशनल बर्ड’. व्हिडिओत तुम्ही पाहिलंत तर यात तुम्हाला दिसेल की, वाघाने आपल्या तोंडात मोराला पकडून ठेवलं आहे. मोर जिवंंत असतो आणि शिकाऱ्याच्या तावडीतून सुटण्यासाठी तो जिवाच्या आकांताने भरपूर प्रयत्न करत असतो. पण वाघाची पकड इतकी जबरदस्त असते की मोराची धडपड त्यापुढे असहाय्य आणि निरर्थक होत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या उमरेड-करहंडला वन्यजीव अभयारण्यातील असल्याचे म्हटले जात आहे.

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

यूजर्सच्या प्रतिक्रिया

शिकारीचा हा व्हिडिओ @ranganphotography नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “हे एआय आहे, कारण मोर उडू शकतात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पाहा, राष्ट्रीय प्राण्याकडून राष्ट्रीय पक्षाची हत्या”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अरे बापरे, आता तर हा राष्ट्रीय वाद झाला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Tiger hunts national bird peacock rare wildlife video umred karhandla maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Lion viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
1

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
2

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
3

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
4

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.