
Viral Video : सोशल मीडियावर (Social Media video) सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक टूर गाईड एका कपलला धबधब्याखाली फोटोसाठी पोज देताना शिकवत आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्सना हसू आवरत नाहीये.
सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ येत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, यावेळी हा व्हिडिओ पाहून यूजर्सना हसू आवरणं कठीण झालेलं आहे. हा व्हिडिओ बाली इथला आहे, जिथे एक टूर गाईड जोडप्याला पोज द्यायला शिकवत आहे. टूर गाईडची शिकवण्याची अनोखी पद्धत पाहून सोशल मीडिया यूजर्सना हसू आवरता येत नाहीये. यूजर्स हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहात आहेत.
southeast asia is the only world region where the uncles there serve and slay pic.twitter.com/bF2bB07u4K — yammi (@sighyam) April 4, 2023
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा टूर गाईड जोडप्याला धबधब्याखाली फोटो कसे काढायचे हे शिकवत आहेत. गाईड दुरूनच जोडप्याला फोटो क्लिक करण्यासाठी पोज देताना दिसत आहे. धबधब्याखाली उभे राहून हे कपल गाईडने दाखवल्याप्रमाणे पोज देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक खूप एन्जॉय करत आहेत.
southeast asia is the only world region where the uncles there serve and slay pic.twitter.com/bF2bB07u4K — yammi (@sighyam) April 4, 2023
हा व्हिडीओ ऑनलाइन शेअर केल्यानंतर 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सनी कमेंट्सही केल्या आहेत. सोशल मीडियावरही लोक या व्हिडिओला प्रचंड पसंती देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा खूप मजेशीर, गंमतशीर व्हिडिओ आहे.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘मी बालीमध्ये होतो तेव्हा मला असेच काहीतरी पाहायला मिळाले.’ आणखी एका युजरने सांगितले की, मलाही तिथे जायचे आहे. व्हिडिओ पाहून हा व्हिडिओ कधीचा आहे याचा अंदाज लावता आला नाही.
एकूणंच काय तर या गाईडचा हा हटके अंदाज सोशल मीडियावर भलताच फॉर्मात आहे असं म्हणायला काय हरकत आहे.