मानवाच्या अट्टाहासाची ठरली बळी! जयपूरच्या गुलाबी रंगवलेल्या हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
रशियन ट्रॅव्हल फोटोग्राफर ज्युलिया बुरुलेवा जयपूरमध्ये पिंक एलिफंट संकल्पनेवर आधारित एक फोटोशूट केले होते. तिने चंचल नावाच्या हत्तीणीला गुलाबी रंगात रंगवले होते. याशिवाय यामध्ये मॉडेल यशस्वीलाही गुलाबी रंगात रंगवून हत्तीणीवर बसवले होते. तिच्या या फोटोशूटने लोकांचे लक्ष वेधले मात्र यावर टीका करण्यात आली होती. प्राणीप्रेमींना याला तीव्र विरोधे केला होता. जगभरातून तिच्यावर टीका केली जात होती. फेब्रुवारी महिन्यात याचे शूट करण्यात आले होते. परंतु या फोटोशूटनंतर काही दिवसांतच हत्तीणीचा मृत्यू झाला आहे.
सध्या या योगायोगामुळे फोटोग्राफवर प्राणीप्रेमींकडून टीका केली जात आहे. फोटोग्राफरविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. एका नेटकऱ्याने तिच्यावर टीका केली आहे की, केवळ इन्स्टाग्रामवरील लाईक्ससाठी आणि स्वत:च्या अहंकारासाठी एका निष्पाप जीवाचा बळी घेतला आहे असे म्हटवले आहे, तर दुसऱ्या एका आजच्या काळात एआय असताना अशा प्रकारे प्राण्यांना त्रास देणे योग्य आहे का असा प्रश्न केला आहे. याला नेटकऱ्यांनी प्राण्यांवर अत्याचार म्हटले असून संबंधित फोटोग्राफवर कारवाईची मागणी केली आहे.
याच वेळी फोटोग्राफर ज्युलिया बुरुलेवा हिने आपल्या कार्याचे स्पष्टीकरणे देत तिने केवळ सेंद्रिक रंगाने हत्तीला रंगवले होते. रंग हत्तीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले होते. तिने सांगितले की, राजस्थानमध्ये सणसमारंभात हत्तीला रंगवण्याची पंरपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मीही त्या पंरपरेचा भाग म्हणून हा रंग निवडला होता. हत्तीणीच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली होती.
तसेच हत्ती गाव विकास समितीचे अध्यक्ष बल्लू खान यांनी देखील, हत्तीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, फोटोशूटसाठी वापरलेला सेंद्रिय गुलाबी रंग लगेच धुवून टाकण्यात आला होता. सध्या राजस्थानच्या वन विभागाने याबाबत चौकशी सुरु असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा किंवा वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारकवाई केली जाईल.






