(फोटो सौजन्य: X)
अलिकडे मात्र पंजाबमधील वाघा-अटारी सीमेवरील एक मजेशीर व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात भारतीय जवानाने उगाचच हवेत फुदकणाऱ्या पाकिस्तानी जवानाची जागीच हवा उतरवली. यासाठी त्याला हिंसेची गरज लागली नाही तर विवेकबुद्धिने त्याने आपल्या एका कृतीनेच पाकिस्तानी सैनिकाला त्याची चूक दाखवत त्याची खिल्ली उडवली. सीमेवरील हा मजेशीर व्हिडिओ आता सोशल मिडियावर यूजर्सचे लक्ष वेधून घेत असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने शेअर केला जात आहे. चला या दृष्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बीएसएफ जवान आणि पाकिस्तान रेंजर्समधील हलका-फुलदा संवाद दिसून येतो. संचलनादरम्यान पाकिस्तानी रक्षक वारंवार उड्या मारत बीएसएफ जवानाला आपली फूर्ती दाखवू पाहत असतो. त्याच्या देहबोलीतून असे वाटते की, तो जवानाला सांगत आहे की आम्ही किती जास्त ताकदवान आणि बलवान आहोत. यावर बीएसएफ जवान शांततेने त्याच्या कृतीचे अनुकरण करत हातवाऱ्यांनी प्रश्न करताना दिसतो की हे तू काय करत आहे. पाकिस्तानी जवानाच्या मिश्किल कृतीला बीएसएफ शांततेत प्रतिउत्तर देतो आणि त्याची चूक त्याला दाखवतो जे पाहून उडत असलेला तो सैनिकही शांत होतो.
या प्रसंगामुळे सोशल मिडियावर मात्र चर्चेला उधाण आले आहे. लोकांना हा व्हिडिओ भारीच आवडला असून सीमेवरील गंभीर बातम्यांमध्ये हा व्हिडिओ सीमेवरची एक वेगळी बाजू आपल्याला दाखवतो. व्हिडिओतील दृष्यांनी लोकांचे मनोरंजन केले असून ते पाहून हसूच आवरता येत नाहीये. वाघा-अटारी सीमेवर दररोज संध्याकाळी ‘बीटिंग रिट्रीट’ समारंभ पार पडतो. ही परंपरा १९५९ पासून चालत आलेली आहे. दोन्ही देशांचे सैनिक लष्करी थाटात संचलन करतात, वेगाने संचलन करतात आणि शेवटी आपापले राष्ट्रध्वज खाली उतरवतात. हा समारंभ जरी थोडा स्पर्धात्मक वाटत असला तरी, तो दोन्ही देशांमधील एक नियमित उपक्रम आहे. हा सोहळा पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने लोक, विशेषतः पर्यटक आणि तरुण, तिथे जमतात.
Bsf solider roasted pak rangers 🤣 pic.twitter.com/wtC3eTCgPd — Honey sain (@yougeshsain) March 30, 2026
दरम्यान हा व्हिडिओ @yougeshsain नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वाघा बॉर्डरवर हे सगळं पाहून एकाच वेळी अभिमानही वाटतो आणि हसूही येतं. या सगळ्या नाटकाची गरजच काय आहे? आपण जे करतो, तेच तेसुद्धा करतात. हे एक प्रकारचं परस्पर मनोरंजन आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बीएसएफच्या जवानाने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे नेहमीचं आहे, पाकिस्तानी स्वतःच चेष्टेचा भाग बनतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






