विजेच्या तारेला स्पर्श झाला अन् थेट डोक्यातच पेटली आगीची ठिणगी, 2 सेकंदांचा मृत्यूचा थरार... अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका ट्रकचालकाच्या मृत्यूची घटना दिसून आली आहे. वास्तविक त्याचा मृत्यू कोणत्या रस्त्यावर किंवा कोणत्या अपघातात घडून आला नाही तर विजेच्या तारेला स्पर्श केल्याने घडून आला आहे. आपली एक चूक आपला कसा जीव घेऊ शकते याचे उत्तम उदाहरण या व्हिडिओत पाहायला मिळते. ट्रकचालकाचा निष्काळजीपणा त्याला नडतो आणि क्षणातच त्याचा जीव घेतो. मृत्यूचा हा लाइव्ह थरार आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून अवघ्या २ सेकंदातच तो मृत्यूला बळी पडल्याचे यात दिसून आले आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
ही घटना राजस्थानमधील उदयपूर येथे घडून आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडून आली. उदयपूरच्या रिको औद्योगिक क्षेत्रातील मोदी केमिकस फॅकट्रीमध्ये एक ट्रक माल उतरवण्यासाठी आला होता. कारखान्याच्या गेटबाहेर ट्रक थांबवण्यात आला असून यातून सगळा माल बाहेर काढला जात होता. ट्रकमालक रामलाल गदरी ट्रकवर असलेली ताडपत्री ठीक करण्यासाठी ट्रकवर चढला खरा पण यावेळी त्याच्यावर एक विजेची ताराही हे त्याच्या ध्यानात येत नाही आणि मग शेवटी नको तेच घडून बसत. नकळतपणे ट्रकचालकाचा हात वर असलेल्या विजेच्या तारांना लागतो आणि त्याला जबरदस्त विजेच्या झटका बसतो. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात ट्रक चालकाला विजेच्या स्पर्श झाल्याने शॉक बसल्याचे दिसते, तारेतून निघालेल्या विजेमुळे त्याच्या डोक्यात जोरदार ठिणगी उठते आणि तो लगेच ट्रकवर पडतो. तपासादरम्यान रामलालचा जागीच मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
दरम्यान घटनेचा हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याच्या एका चुकीने त्याचा जीव घेतला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “विजेचा झटका लय बेकार” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “गरिबांसोबत असंच घडतं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.