(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियाच्या जगात कधी काय घडून येईल याचा नेम नाही. इथे अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात जे आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात. इथे फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ शेअर केले जातात ज्यातील दृश्ये आपला थरकाप उडवतात. प्राण्यांच्या राज्यात हिंसेला फार महत्त्व, इथे नेहमीच कुणी ना कुणी एकमेकांवर हल्ला करू पाहत असतो. हल्लयाचे हे दृश्य इतके जबरदस्त असतात की त्यांचे व्हिडिओज पाहूनच आपल्या अंगावर काटा येतो. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका श्वानाने मगरीसोबत पंगा घेतल्याचे दृश्य दिसून आले. मगर हा जंगलातील एक धोकादायक शिकारी आहे अशात त्याच्या वाटेल जाण म्हणजे मृत्यूलाच जवळ करणं. असोत व्हिडिओत कुत्र्याला मगर जन्माची अद्दल घडवताना दिसून येते. व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओत हिरो बनण्याच्या नादात झिरो बनलेला कुत्रा दिसून येतो. व्हिडिओच्या सुरुवातीला, एक काळजीवाहक स्टीलचे रॉड आणि चिमट्याच्या मदतीने मगरीला कुंपणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. आतापर्यंत मगर शांत आहे पण नंतर इथे कुत्र्याची एंट्री होते. कुत्रा आपल्या मालकाची मदत करण्यासाठी मगरीजवळ जातो आणि तिला चावण्याचा प्रयत्न करतो. पण कथेत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा मालकाची पकड सैल होताच मगर संधीचा फायदा घेते आणि कुत्र्याचे तोंड आपल्या जबड्यात पकडते. तो जबडा, जो एकदा बंद झाला की सैतानी कुलूपापेक्षा कमी नाही. कुत्रा ओरडू लागतो आणि धडपडायला लागतो, पण मगरीचे जबडे त्यांची पकड सोडत नाहीत. व्हिडिओत पुढे काय घडलं हे तर समजलं नाही पण या हल्ल्यात कुत्र्याला नाक्कीच गंभीर दुखापत झाली असावी. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक हे दृश्य मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @foodiechina_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जबड्यात जबडा आला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता परत कुत्रा मगरीच्या वाटेला जणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो कुत्रा पुन्हा तसा प्रयत्न करणार नाही याची खात्री आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.