(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मगर हा पाण्याचा सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. पाण्यात लपून ती माशांचेच काय तर हवेत उडणाऱ्या पक्षांच्याही शिकारी करते. तिच्या या चपळ आणि थरारक शिकारींमुळेच तिला पाण्याचा राक्षस असे संबोधले जाते. मगरीच्या भयानक शिकारीचे व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र सध्या मगरीसंबंधीचा एक अचंबित करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात मगर खुद्द श्वानांची शिकार झाल्याचे दिसून येत आहे. हा उलटा कारभार पाहून अनेकजण हादरले आहेत. नक्की व्हिडिओत काय घडले तर सविस्तर जाणून घेऊयात.
मगर हा कितीही शक्तिशाली प्राणी असला तरी त्याची शक्ती पाण्यात बाहेर कामी येत नाही. सध्याच्या व्हायरल व्हिडिओत देखील याचीच प्रचिती मिळताना दिसून येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन कुत्रे मगरीवर हल्ला करताना दिसत आहेत. मगरी जमिनीवर रेंगाळत असून कुत्रे त्याला घेरून ओरबाडत असल्याचे दिसून येते. मगर वारंवार आपल्या स्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, परंतु कुत्रे त्याच्यावर हल्ला करत राहतात. हे दृश्य खरोखरच आश्चर्यकारक आहे, कारण सहसा मगरी शिकार करताना दिसतात, परंतु येथे कुत्रे मगरीचे शिकार करताना दिसून येत आहे.
व्हिडीओत मगर अस्वस्थ होऊन स्वतःचा जीव वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसते. मगरीचे शरीर जड आहे, आणि ते वेगाने पळून जाण्याच्या स्थितीत नाही, ज्यामुळे कुत्र्यांना हल्ला करणे सोपे होते. व्हायरल व्हिडिओत, दोन्ही कुत्रे मगरीवर मिळून हल्ला करताना आणि तिला चावताना दिसत आहेत, जणू ते मिळालेल्या संधीचा फायदा घेत असावेत. आता या हल्ल्यात पुढे काय होते ते मात्र स्पष्ट होत नाही आणि व्हिडिओचा शेवट होऊन जातो. व्हिडिओतील ही दृश्ये सर्वांनाच हादरवणारी आहेत, ज्यामुळे फार कमी वेळेत हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे.
काळाचा घात: बाईकची डिवाइडरला जोरदार धडक, हवेत उडाले अन् जागीच… मृत्यूचा थरारक Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @wonderful_place12 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला बऱ्याच लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मगरीचे तोंड टेपने बंद केले आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मगर वृद्ध आणि शांत असावी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.