Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दातांनी कार ओढत सुरू केली अनोखी कावड यात्रा! व्यक्तीच्या शिवभक्तीने वेधले लोकांचे लक्ष; Video Viral

Pulls Car With Teeth : हरिद्वारहून गंगेचे पाणी घेऊन परतणाऱ्या शिवभक्ताच्या अथांग श्रद्धेने सर्वांना थक्क केले. गाडीला सजवत दातांच्या साहाय्याने चारचाकी त्याने ओढत नेली अन् शिवभक्ताची अस्सीम ताकद आणि भक्ती पाहून यूजर्स अवाक् झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 04, 2026 | 03:00 PM
दातांनी कार ओढत सुरू केली अनोखी कावड यात्रा! व्यक्तीच्या शिवभक्तीने वेधले लोकांचे लक्ष; Video Viral

दातांनी कार ओढत सुरू केली अनोखी कावड यात्रा! व्यक्तीच्या शिवभक्तीने वेधले लोकांचे लक्ष; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कावड यात्रेदरम्यान एका शिवभक्ताच्या अनोख्या कृतीने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले.
  • हरिद्वारहून सुरू झालेल्या या यात्रेचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये आश्चर्य आणि चर्चेला उधाण.
  • पारंपरिक कावड यात्रेला वेगळा आयाम देणारा हा प्रवास सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.
श्रावण महिन्यात शिवभक्तांची अनोखी अस्सीम भक्ती पाहायला मिळते. याकाळात अनेकजण कावड यात्रा भाग घेऊन शिवाला पवित्र गंगाजल अर्पण करतात. हिंदू धर्मातील ही सर्वात पवित्र यात्रा मानली जाते. अलिकडे मात्र एका शिवभक्ताचा अनोखा पराक्रम सोशल मिडियावर शेअर करण्यात आला ज्यातील दृष्ये पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. व्हायरल दाव्यानुसार, अलीगढच्या छज्जूपूर गावातील रहिवासी असलेले नरेंद्र जाट, हरिद्वारहून ११ लिटर गंगेचे पाणी घेऊन कावड यात्रेला निघाले. पण या यात्रेसाठी त्यांनी काहीतरी वेगळं करु पाहिलं. आपल्या दातांनी जड चारचाकीला पुढे खेचत त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. त्यांची अस्सीम भक्ती आणि धैर्य पाहून अनेकांना धक्काच बसला नाही तर त्यांच्या या साहसावर अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले.

डोक्यावर सेहरा, अंगावर शेरवानी… लग्नाआधी डिलिव्हरी करायला निघाला वर, पेट्रोल पंपावरील दृष्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्रा जाट यांनी आपल्या कठीण यात्रेची सुरुवात हरिद्वारमधील पवित्र हर पौरी येथून केली. गाडीत ११ लीटर गंगाजल घेऊन त्यांनी आपल्या गंतव्यस्थापर्यंत वाटचाल सुरु केली. सहसा यात्रेकरुन कावड आपल्या खांद्यावर वाहून नेतात पण व्हिडिओत नरेंद्र मात्र आपल्या दातांनी गाडीला ओढत नेऊन पुढे वाटचाल करताना दिसले. मुख्य म्हणजे, दातांनी गाडी ओढत असताना ती गाडी खरोखर वेगाने पुढे सरकली जात होती, जे सामान्यपणे कुणालाही करता येणे शक्य नाही. त्यांच्या या अनोख्या भक्तीने अनेकांना थक्क केलं तर काहींनी याला भक्तीची ताकद असेही म्हटलं.

हापुड़ के कांवड़िया ने दांतों से खींची कार, वीडियो वायरल उत्तर प्रदेश के हापुड़ में कांवड़िया नरेंद्र जाट ने हरिद्वार से गांव तक गंगाजल और भगवान शिव की प्रतिमा लेकर जाते समय दांतों से कार खींची. इस दौरान बड़ी संख्या में लोग मौजूद रहे और घटना का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो… pic.twitter.com/NyErlq63eJ — zingabad (@zingabad) July 29, 2026

शिकार करायला गेला अन् क्षणात बेडकाने डावच पलटला, जंगलाच्या शिकाऱ्याला चावून खाल्लं अन्… शिकारीचा Video Viral

नरेंद्र जी गाडी दाताने ओढत पुढे नेत होते त्याला फार सुबकरित्या सजवण्यात आले होते. गाडीला भगवे झेंडे लावले होते, तर याच्या बोनेटवर भगवान शिवाचे एक पोस्टर देखील लावण्यात आले होते. इतकंच नाही तर उष्णतेतून गाडी ओढताना त्रास होऊ नये यासाठी गाडीच्या कोपऱ्यावर एक पंखा देखील बसवण्यात आला होता. या खडतर प्रवासात नरेंद्र एकचे नव्हते तर त्यांच्यासोबत इतर पाच शिवभक्त आणि एक १० वर्षांचा मुलगाही यात्रेत सामील झाला होता. ‘हर हर महादेव’ आणि ‘जय शिव शंभू’च्या गजरात हा संपूर्ण गट पुढे वाटचाल करत होता. दरम्यान या अनोख्या कावड यात्रेचा व्हिडिओ @zingabad नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं असून सोशल मिडियावर ही घटना सध्या चांगलीच ट्रेंडमध्ये आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Unique kanwar yatra by shiv devotee video shocked everyone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Shravan 2026
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

डोक्यावर सेहरा, अंगावर शेरवानी… लग्नाआधी डिलिव्हरी करायला निघाला वर, पेट्रोल पंपावरील दृष्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
1

डोक्यावर सेहरा, अंगावर शेरवानी… लग्नाआधी डिलिव्हरी करायला निघाला वर, पेट्रोल पंपावरील दृष्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

शिकार करायला गेला अन् क्षणात बेडकाने डावच पलटला, जंगलाच्या शिकाऱ्याला चावून खाल्लं अन्… शिकारीचा Video Viral
2

शिकार करायला गेला अन् क्षणात बेडकाने डावच पलटला, जंगलाच्या शिकाऱ्याला चावून खाल्लं अन्… शिकारीचा Video Viral

नाशिकमध्ये आई-वडिलांनी टाकून दिली चिमुकली; चेहऱ्यावरील निरागस स्मितहास्याने सोशल मीडिया यूजर्स झाले भावूक; Video Viral
3

नाशिकमध्ये आई-वडिलांनी टाकून दिली चिमुकली; चेहऱ्यावरील निरागस स्मितहास्याने सोशल मीडिया यूजर्स झाले भावूक; Video Viral

Priyanka Chopra : यालाच म्हणतात संस्कार! हॉलिवूडमध्ये राहूनही लेक मालतीला ‘दुर्गा सप्तशती’चे मंत्र शिकवते प्रियांका चोप्रा
4

Priyanka Chopra : यालाच म्हणतात संस्कार! हॉलिवूडमध्ये राहूनही लेक मालतीला ‘दुर्गा सप्तशती’चे मंत्र शिकवते प्रियांका चोप्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.