Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झटका आला अन् एका सेकंदात गेला जीव! जिममध्ये वर्कआउट करताना काॅन्टेबलचा मृत्यू; घटनेचा चित्तथरारक Video Viral

Death Viral Video : काळाने केला घात... ! जिममध्ये वर्कआउट करताना अचानक झटका आला अन् अवघ्या एका सेकंदातच काॅन्स्टेबल जमिनदोस्त झाले. घटनेचा हा व्हिडिओ तेथील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला असून यात मृत्यूचा थरार दिसून येतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2026 | 02:09 PM
झटका आला अन् एका सेकंदात गेला जीव! जिममध्ये वर्कआउट करताना काॅन्टेबलचा मृत्यू; घटनेचा चित्तथरारक Video Viral

झटका आला अन् एका सेकंदात गेला जीव! जिममध्ये वर्कआउट करताना काॅन्टेबलचा मृत्यू; घटनेचा चित्तथरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जिममध्ये नियमित व्यायाम सुरू असतानाच अचानक एक अनपेक्षित घटना घडली.
  • काही क्षणांत परिस्थिती इतकी गंभीर बनली की उपस्थित लोकांची धावपळ उडाली.
  • संपूर्ण प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आजकाल कधी कुणाचा कसा जीव जाईल ते सांगता येत नाही. मागील काही काळापासून अकस्मात मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अलिकडेच सोशल मिडियावर यासंबंधित आणखी एक घटना शेअर करण्यात आली आहे. ही घटना उत्तराखंडमध्ये घडली असून एका जिममध्ये वर्कआउट करताना काॅन्टेबलचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेचा हा थरार तेथील सीसीटिव्ही कॅमेरात कैद करण्यात आले असून हे फुटेज आता सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काॅन्टेबलचा मृत्यू नक्की कसा झाला ते स्पष्ट पाहता येते.

समोसाही गद्दार निघाला…? व्हिडिओत पदार्थाची सत्यता पाहून यूजर्सना बसला धक्का, नक्की काय घडलं ते जाणून घ्या

नक्की काय घडलंं?

सदर घटना ही चंपावतच्या बनबसा येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. मृताची ओळख ३८ वर्षीय सैनिक गिरीश भट्ट अशी पटली आहे. शुक्रवारी जिममध्ये व्यायाम करताना अचानक त्यांची प्रकृती ढासळते आणि ते जमिनीवर जाऊन पडतात. जिममध्ये उपस्थित लोक त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात पण याचा काहीच फायदा होत नाही. पुढे खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डाॅक्टर त्यांना मृत घोषित करतात. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) असल्याचे समोर आले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात गिरीश जिममध्ये नेहमीप्रमाणे वर्कआउट करताना दिसतात. पण काही सेकंदातच त्यांना काहीतरी जाणवत असल्याचे दिसते. जणू त्यांना आधीच समजलं होतं की मृत्यू जवळ आला आहे. ते लगेच मशीनवरुन खाली उतरतात आणि पुढे चालायला जातील इतक्याच त्यांचा तोल ढासळतो आणि ते जमिनीवर पडतात. नंतर जिममध्ये उपस्थित लोक त्यांच्या दिशेने धाव घेतात, त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात पण तोपर्यंत फार वेळ झालेला असतो.

चम्पावत: उत्तराखंड पुलिस के स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) के 38 वर्षीय जवान गिरीश भट्ट की जिम में व्यायाम करते समय अचानक तबीयत बिगड़ने से मौत हो गई। यह दुखद घटना शुक्रवार को चम्पावत जिले के बनबसा क्षेत्र में हुई। पुलिस सूत्रों और स्थानीय जानकारी के अनुसार, गिरीश भट्ट (पुत्र… pic.twitter.com/M6Ny9r4Xi6 — Jyoti Mishra (@JyotiMishr9353) June 21, 2026

मुस्लिम आहे तर पाकिस्तानी झालो का? पोलिस अधिकाऱ्यांसमोर तरुणाचा चढला पारा, म्हणाला भारतीय सैन्यात… Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @JyotiMishr9353 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “परमेश्वर दिवंगत सैनिक गिरीश भट्ट यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबाला हे अथांग दुःख सहन करण्याची शक्ती देवो. त्यांची सेवा, शौर्य आणि समर्पण सदैव स्मरणात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. ही घटना आमच्या जवळ, तनकपू येथे घडली”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दुःखद घटना” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भावपूर्ण श्रद्धांजली”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Uttarakhand constable collapses during workout in gym cctv video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Death
  • Uttarakhand
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

गणपतीपुळे समुद्रात पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे 5 जण बुडाले, पर्यटनाचा आनंद क्षणात विरला
1

गणपतीपुळे समुद्रात पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे 5 जण बुडाले, पर्यटनाचा आनंद क्षणात विरला

समोसाही गद्दार निघाला…? व्हिडिओत पदार्थाची सत्यता पाहून यूजर्सना बसला धक्का, नक्की काय घडलं ते जाणून घ्या
2

समोसाही गद्दार निघाला…? व्हिडिओत पदार्थाची सत्यता पाहून यूजर्सना बसला धक्का, नक्की काय घडलं ते जाणून घ्या

मुस्लिम आहे तर पाकिस्तानी झालो का? पोलिस अधिकाऱ्यांसमोर तरुणाचा चढला पारा, म्हणाला भारतीय सैन्यात… Video Viral
3

मुस्लिम आहे तर पाकिस्तानी झालो का? पोलिस अधिकाऱ्यांसमोर तरुणाचा चढला पारा, म्हणाला भारतीय सैन्यात… Video Viral

अजब-गजब! ’50 लाख दे नाहीतर मृतदेह सापडेल’, अपहरणाचे नाटक करुन व्यक्तीने पत्नीकडेच मागितली खंडणी; Video Viral
4

अजब-गजब! ’50 लाख दे नाहीतर मृतदेह सापडेल’, अपहरणाचे नाटक करुन व्यक्तीने पत्नीकडेच मागितली खंडणी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.