Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

Viral Video : उत्तराखंडच्या गुच्चुपानी येथे प्राचीन गुफा पाहण्यासाठी पर्यटक आले होते. गुफा पाहण्याऐवजी त्यांनी गुफेत डिजेत लावला आणि हरियाणवी गाण्यावर डान्स करायला सुरुवात केली. या घटनेमुळे इतिहासप्रेमी आणि यूजर्स चांगलेच भडकले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 22, 2026 | 11:08 AM
गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • प्राचीन गुहेत पर्यटकांनी नेमका काय धिंगाणा घातला?
  • व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर संतापाची लाट
  • पर्यटनस्थळी पर्यटकांच्या वागणुकीवर उपस्थित झाले गंभीर प्रश्न
देशातील उत्तराखंड हे राज्य शांत आणि नैसर्गिक सुंदरतेसाठी ओळखले जाते. अनेक पर्यटक फिरण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात. अशात अलिकडेच उत्तराखंडमधील एका प्राचीन गुहेत पर्यटक डिजे लावून धिंगाणा घालताना दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून इंटरनेटवर व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. ऐतिहासिक वास्तू किंवा नैसर्गिक ठिकाणे फिरताना तर आपल्याला फार मजा वाटते पण तिकडे गेल्यानंतर मात्र पर्यटक त्या ठिकाणाची योग्य निगा राखत नाही.

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

बऱ्याचदा पर्यटनस्थळी जाऊन पर्यटक खाल्लेले अन्नपदार्थांचे रॅपर किंवा वापरलेले अन्य साहित्य तिथेच फेकून जातात. वास्तूंमध्ये इतिहास दडलेला असतो अशात अशा ठिकाणी जाऊन माहिती घेण्याऐवजी इतिहास जाणून घेण्याऐवजी त्या जागी जाऊन कचरा टाकणे किंवा धिंगाणा घालणे म्हणजे त्या जागेचा अपमान करण्यासारखं आहे. यामुळेच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सने व्हिडिओतील प्रकारावर आपल्या टिका व्यक्त केल्या आहेत. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओतील दाव्यानुसार, ही घटना उत्तराखंडच्या डेहरादून येथील गुच्चुपानी येथे घडून आली. काही पर्यटक प्राचीन गुफा पाहण्यासाठी इथे आलेले असतात. पण गुफा पाहण्याऐवजी त्यांचा तिथे एक वेगळाच धिंगाणा सुरु होतो. तरुणांचा ग्रुप तिथे डिजे स्पीकर घेऊन दाखल होतो. ते गुफा पाहण्यासाठी गुफेच्या आत शिरतात आणि तिथे डिजेच्या तालावर डान्स करु लागतात. आपल्यासोबत आणलेल्या भल्यामोठ्या डिजेवर ते हाय म्यूजिक हरियाणवी गाणं लावतात आणि बेधुंद होऊन ऐतिहासिक वास्तूत धिंगाणा घालू लागतात. या व्हिडिओमध्ये यूजर्सचा संताप अनावर झाला असून अशा लोकांना पर्यटनस्थळी एंट्रीच दिली नाही पाहिजे अशा प्रतिक्रिया व्हिडिओला मिळत आहेत.

या घटनेचा हा व्हिडिओ @himalayanhindu नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘कृपया कोणीतरी या एचआर लोफर्सना उत्तराखंडमधून हद्दपार करा. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असे कसे वागू शकता? ही आदिमानवाची मानसिकता आहे. आणि त्यांची गाणी ऐका… ‘लोफर थे हरियाणा के’. त्यांनी स्वतःच कबूल केले आहे की ते लोफर आहेत. ही घटना डेहराडूनच्या गुचुपाणी येथील आहे’.

Someone ban these HR LOFARS from Uttarakhand pls. How do you even behave like this in public? This is stone age mentality. And listen to their songs… ‘Lofar they Haryana ke’. They literally admitted themselves that they are lofars. Btw this was at Gucchupani, Dehradun. pic.twitter.com/M6R827v7wr — Himalayan Hindu (@himalayanhindu) August 18, 2026

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “हे एचआरचे नालायक जिथे जातात तिथे त्रास देतात, नुकतेच हरिद्वारमधील एचआर कावडने तर ढीगभर कचरा मागे सोडून दिला!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जे लोक विचारत आहेत की काय चूक आहे, त्यांना मला विचारायचं आहे की, तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलीसोबत अशा ठिकाणी जाणे पसंत कराल का? तुम्ही अशा पर्यटन स्थळाला भेट देता जिथे हे लोकसुद्धा येतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या किशोरवयीन मुलीसोबत आणि कुटुंबासोबत या लोकांमध्ये सुरक्षित वाटेल का?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “राज्याला दोष देण्यात काहीच तर्क नाही, आपल्या देशात मूर्ख सगळीकडे आहेत. त्यांच्याशी जागेवरच कठोरपणे वागण्याची गरज आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Uttarakhand robers cave tourists dance dj haryanvi song viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Uttarakhand
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
1

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
2

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
3

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक
4

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.