नर्सरी टीचर्सच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यामुळे हसू आवरता येत नाही. सोशल मीडियावर अगदी सहानांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सामान्य नागरिकांपासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ असतात. सध्या नर्सरी टीचर्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ नर्सरीच्या महिला टिचर्सच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिक्षकांना मिलांना कसे शिकवायचे, त्यांना आनंदी कसे ठेवायचे जेणेकरून ते शाळेत रोज शिकण्यासाठी येतील यासाठी प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षण दिले जाते. हे पाहिले जाते की, शिक्षकाला मुलांना संबाळायला जमेल की नाही. त्याचाच हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून काहींनी कपाळाला हात लावला आहे तर काहींनी खूप कौतुक केले आहे.
असे प्रशिक्षण तुम्ही कधी पाहिले आहे का?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नर्सरीच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. काही महिला शिक्षिका खोलीत त्यांच्या पोशाखामध्ये उभ्या असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सर्व शिक्षकांना ‘आहा टोमॅटो खूप मजेदार आहे’ या कवितेचे प्रशिक्षण दिले जात आहे. लहान मुलांना प्रेमाने आणि चांगले कसे शिकवायचे याचे प्रशिक्षण त्यांना दिले जात असून, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्या ठिकाणी दोन पुरूष शिक्षक त्यांना गाण्यावर कसे हावभाव करायचे हे विचारत आहे. महिला शिक्षिका अगदी हातावरे करत गाणे म्हणत डान्स करत आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर drnitinshakya_sdm नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्श्नमध्ये लिहिले आहे की, ‘नर्सरी शिक्षकांंना चांगले प्रशिक्षण दिले जात आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारोहून अधिक लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, शिक्षकांना कार्टून बनवून ठेवले आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत घेतात, आणखा एका युजरने लिहिले आहे की, अरे मुलांना अशी गाणी शिकवण्यापेक्षा महारांजांचे पोवाडे शिकवा, ही गाणी त्यांचे ज्ञान वाढवणार नाहीत. तसेच एका युजरने म्हटले आहे की, आपण कोणत्या ग्रहावर आलो आहोत.