फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर तसे तर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्स रील्स, तर कधी भांडणाचे व्हिडिओ. तसेच धोकादायक स्टंटचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. पण अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपण कौतुक केल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक सरकारी शाळेतील शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी शिक्षकाचे कौतुक केले आहे.
तसे तर सध्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात देखील बरेच बदल घडले आहेत. शिक्षण आता खूप सहज सोपे तर झाले आहेच पण सर्व गोष्टी आता इंटरनेटनमध्ये बदलल्या गेल्यामुळे तसेच खाजगी शाळांमुळे सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे. याशिवाय इतरही कारणे आहेत जसे की, सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचा अभाव. अनेकांना वाटते की, सरकारी शाळांमध्ये शिकवले जात नाही. यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे.
टाकाऊपासून टिकाऊ वस्तू
पण व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील एका सरकारी शाळेचा आहे. हा व्हिडिओ बिहारमधील छपरा गावातील आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शिक्षकाने काही गोष्टी बनवल्या आहेत ज्यामुळे मुलांना त्यांचे विषय सहज समजतील. उदाहरणार्थ, मुलांना मोजणी शिकवण्यासाठी शिक्षकाने वेगळ्या प्रकारचा मोजणी तक्ता बनवला आहे. याशिवाय मुलांना गणित विषयातील कोन शिकवण्यासाठी एक लाकडी वाद्य तयार केले आहे, जे शिक्षक गोल गोल फिरवून मुलांना सर्व प्रकारचे कोन सांगत आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून असे आणखी अनेक शिकण्याचे साहित्य तयार केले आहे. जेणेकरून मुलांना त्यांच्या अभ्यासाचे ओझे वाटणार नाही आणि त्यांना नवीन गोष्टी सहज शिकता येतील.
व्हायरल व्हिडिओ
सरकारी स्कूलों में ऐसे पढ़ाई हो तो कोई आदमी प्राइवेट स्कूलों में पढ़ाने के लिए नहीं सोचेगा। pic.twitter.com/Kn1hAA3WIw
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) September 27, 2024
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी शिक्षकाचे कौतुक केले
या सरकारी शिक्षकाने मुलांना शिकवण्याची अनोेखी पद्धत वापरली आहे. ज्यामुळे सर्वत्र या शिक्षकाचे कौतुक होताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ChapraZila अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी यावर कमेंट करत कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, ‘बिहारच्या शिक्षकांमध्ये खूप प्रतिभा आहे, म्हणूनच बिहार ही ज्ञानाची भूमी आहे, ज्ञानाचा प्रवाह येथून जातो.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, ‘हे एक अतिशय कौतुकास्पद पाऊल आहे.’ तर आणखी एका युजरने म्हटले आहे, की असेच जर सरकारी शाळांमध्ये प्रभावी शिक्षक असतील तर खाजगी शाळांमध्ये कोणीही जाणार नाही.