कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण (फोटो- सोशल मीडिया)
कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे निर्माण झाला वाद
कर्मचारी वर्गात तीव्र चिंता आणि भीतीचे वातावरण
निवडणूक प्रशासनाने केल्या नियुक्त्या
पुणे: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. कनिष्ठ लिपिकांना थेट मतदान केंद्राध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्याने संबंधित कर्मचारी वर्गात तीव्र चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापैकी अनेक कर्मचारी अवघ्या एक-दोन महिन्यांपूर्वीच शिपाई किंवा हमाल पदावरून पदोन्नत होऊन लिपिक झालेले आहेत. प्रशासकीय अनुभव नसताना एवढ्या मोठ्या कायदेशीर आणि तांत्रिक जबाबदारीची नेमणूक करण्यात आल्याने निवडणूक प्रक्रियेत गंभीर चुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या ‘निदेशपुस्तिका २०२३’ मधील तरतुदींनुसार केंद्राध्यक्ष हा पथकातील इतर मतदान कर्मचाऱ्यांपेक्षा उच्च वेतनश्रेणीचा असणे अपेक्षित आहे (मुद्दा ३.२.१-चार). मात्र सध्या २४०० ग्रेड-पे असलेल्या कनिष्ठ लिपिकांच्या अधिपत्याखाली ४३०० ग्रेड-पे असलेले वरिष्ठ अधिकारी काम करणार असल्याने प्रशासकीय विसंगती निर्माण होत आहे.
याशिवाय, केंद्राध्यक्ष हा शक्यतो राजपत्रित किंवा किमान पर्यवेक्षकीय पदावर कार्यरत असावा, अशी स्पष्ट शिफारस आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये (मुद्दा ३.१२.३) नमूद आहे. प्रत्यक्षात मात्र या अटींचा विचार न करता नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
कर्मचाऱ्यांचा संताप आणि भीती
आम्ही अजून लिपिक पदावर स्थिरावलोही नाही. निवडणूक प्रक्रियेत किरकोळ चूक झाली तरी थेट निलंबन किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. प्रशासनाने आमचा अनुभव, दर्जा आणि क्षमतांचा विचार करूनच जबाबदाऱ्या द्याव्यात, अशी प्रतिक्रिया भयभीत कनिष्ठ कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
हे देखील वाचा : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका! प्रचार गीतातील एका शब्दाने निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार
मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी मुस्लीम महिला मुंबईच्या महापौर होणार असल्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये बुरखा घातलेली महिला मुंबईची महापौर होणार का यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जेव्हा वारिस पठाण यांनी हे सांगितले तेव्हा उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही; त्यांनी तोंडाला कुलूप घातले. पण मी पुन्हा एकदा सांगतो की मुंबईचा महापौर एक हिंदू, एक मराठी असेल.” अशी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.






