
अजब लग्नाची गजब कहाणी! घोड्यावर बसले अन् वधूच्या घरी पोहचले तब्बल 29 वर, मग पुढे जे घडलं... Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर सध्या एका अजब लग्नसोहळ्याचा व्हिडिओ फार ट्रेंड करत आहे. व्हिडिओमध्ये एका लग्नाचे चित्रण केले आहे, ज्यामध्ये वर लग्नाच्या मिरवणुकीचे नेतृत्व करतो. तथापि, या अनोख्या मिरवणुकीत वरांची संख्या इतकी जास्त दिसली की पाहून सर्वच चकित झाले. व्हिडिओमध्ये रस्त्यावर लग्नाच्या मिरवणूकीचे दुर्लभ दृश्य दिसते, ज्यात एका मागून एक घोड्यावर अनेक वर लग्नासाठी वधूच्या घरी जाण्यासाठी सज्ज असतात. हे दृश्य एका व्यक्तीने आपल्या आपल्या चारचाकीत बसून फोनच्या कॅमेरात कैद केले. तो बोलतो की, माझ्या संपूर्ण आयुष्यात एकावेळी इतके वर कधीही नाही पाहिले. मी गाडी परत फिरवून काऊंट करत आहे. गाडीला हळूहळू चालवत तो बाजूने जाणाऱ्या लग्नाच्या मिरवणूकीतील प्रत्येक वराची मोजणी सुरु करतो आणि याचे उत्तर असे मिळते की त्या वरातीत एकूण 29 वर घोड्यावर बसून सामील झालेले असतात. एकाच वरातीत इतक्या वरांना पाहून आता यूजर्स अवाक् झाले आहेत.
या अनोख्या वरातीचा व्हिडिओ @mrfalanaa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ टॅग करा त्या मुलींना ज्यांना वर सापडत नाहीत’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही तर 7 करोडची वरात आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ तो विवाह संमेलन आहे, जो बेटी फाउंडेशनने आयोजित केला होता.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वर पक्षाची रॅली निघाली आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.