(फोटो सौजन्य – Reddit)
काय घडलं व्हिडिओत?
दक्षिण आफ्रिकेतील कापामा प्रायव्हेट गेम रिझर्व्हमधील हा व्हिडिओ आहे. त्यात सिंहांचे एक संपूर्ण कुटुंब नदीकाठी आराम करत असल्याचे दिसत आहे. काही पाणी पीत आहेत, तर काही उन्हात तळपताहेत. पण अचानकच इथले शांत वातावरण गोंधळात बदलते आणि सिंहाचं कुटुंब घाबरत नदीकाठून दूर पळू लागतं. खरंतरं घडलं असं की, एक पाणघोडा पाण्यातून बाहेर येत असतो. सुरुवातीला, तो फक्त आपले डोके बाहेर काढतो आणि सिंहांकडे पाहतो. पण किनाऱ्याजवळ येताच तो अचानक पूर्ण ताकदीने पाण्यातून उडी मारतो. पाणघोड्याची जलद उडी पाहून सिंहाचे कुटुंब घाबरते. क्षणार्धात, संपूर्ण गट पळून जातो, जणू ते काही धोकादायक हल्ल्याची अपेक्षा करत आहे. व्हिडिओमध्ये सिंहांची भीती स्पष्टपणे दिसून येते. जंगलातील सर्वात जास्त शक्तीशाली कुटुंबाला असं घाबरताना पाहून आता यूजर्स चांगलेच थक्क झाले आहेत. जंगलातील अनेक घटना या अनपेक्षित असतात, इथे कोण कधी कुणावर वर्चस्व गाजवेल ते सांगता येत नाही.
One lunge from the hippo and those lions are outta there
byu/Prestigious-Wall5616 inbadassanimals
हा व्हायरल व्हिडिओ @Prestigious-Wall5616 नावाच्या रेडीट अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते फक्त समुद्रकिनारी दिवस घालवत आहेत! काय मजा आहे. हाहाहा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कारण सिंहांना माहित आहे की एका चाव्याने पाणघोडा त्यांना प्रभावीपणे अर्धे चावू शकतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला वाटतं सिंह हे ‘जंगलाचे राजे’ नाहीत का? पाणघोडे राज्य करतात! ते प्रचंड आहेत!”.’
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






