
13 वर्षांच्या शोधानंतर अखेर सापडलं... जगातील सर्वात दुर्मिळ 'मृतदेहाचे फुल'; Viral Video ने सर्वांनाच केलं चकित
ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral
सुमात्राच्या घनदाट वर्षावनात, पर्यावरणवादी सेप्टियन अँड्रिकी, ज्याला ‘डेकी’ म्हणूनही ओळखले जाते, ते जमिनीवर गुडघे टेकून रडत असताना दिसून आले. पण त्यांचे हे अश्रू दुःखाचे अश्रू नसून ते होते आनंदाश्रू… व्हिडिओ पुढे जाताच आपल्याला समोर राफ्लेसिया हॅसेल्टी या दुर्मिक फुलाचे दर्शन घडते. हे तेच फूल आहे जे गेल्या दशकाहून अधिक काळ कोणत्याही मानवाने जंगलात पाहिले नव्हते. एबीसीच्या मते, डेकी आणि त्याच्या टीमला स्थानिक रेंजरकडून माहिती मिळाली की जंगलात खोलवर एक दुर्मिळ कळी दिसली आहे. त्यानंतर टीमने वाघांनी व्यापलेल्या प्रदेशातून, कठीण चढाईतून आणि फोनच्या बॅटरी संपत असताना २३ तासांचा कठीण प्रवास केला.
फुलाचा शोध घेतल्यानंतर डेकी म्हणाले की, “१३ वर्षांची वाट पाहणे, २३ तासांचा प्रवास… जेव्हा तो क्षण आला तेव्हा मी फक्त रडू शकलो,” हा ऐतिहासिक क्षण ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बोटॅनिक गार्डनचे उपसंचालक क्रिस थोरोगूड यांनी कॅमेऱ्यात कैद केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता व्हिडिओला जगभरातून उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. कधीही न पाहिलेल्या या अनोख्या फुलाचे दृश्य पाहून सर्वच भारावून गेले. हे फुल जगातील सर्वात मोठे फुल असून यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे ते खास ओळखले जाते. या फुलांना सडलेल्या मांसासारखा वास येतो. याची रुंदी १ मीटर रुंदीपर्यंत वाढू शकते आणि याचे वजन ६ किलोग्रॅमपर्यंत पोहोचू शकते.
डॉ. थोरोगूड म्हणतात, “हे सर्वात सुंदर आहे, पांढऱ्या पाकळ्यांवर लाल ठिपके आहेत, जणू काही निसर्गानेच ते सजवले आहे.” या प्रजातीचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे… याची कळी विकसित होण्यासाठी नऊ महिने लागतात. पण ती फक्त काही दिवसांसाठी फुलते. हे फुल सापडणे फार कठीण आहे. शोधकर्त्यांना ज्या ठिकाणी हे फूल सापडले ते सुमात्रान वाघ आणि गेंड्यांचे क्षेत्र आहे.
ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral
दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठाने जेव्हा हा शोध पोस्ट केला तेव्हा वाद निर्माण झाला. काहींनी असा आरोप केला की स्थानिक मार्गदर्शक, डेकी आणि इस्वांडी यांना पूर्ण श्रेय देण्यात आले नाही. विद्यापीठाने नंतर स्पष्टीकरण दिले आणि त्यांचे जाहीर आभार मानले. हा शोध आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देतो की निसर्गात अशा अनेक सुंदर गोष्टी दडलेल्या आहेत ज्यांच्यापासून मानव अपरिचित आहे.