(फोटो सौजन्य – X)
काय प्रकरण आहे?
समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील हुबळी येथे मेधा क्षीरसागर आणि भुवनेश्वर येथील संगम दास यांची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. दोघेही बेंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असून २३ नोव्हेंबर रोजी भुवनेश्वरमध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर, २ आणि ३ डिसेंबर रोजी वधूच्या मूळ गावी हुबळी येथे त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. यासाठी कुटुंबीयांनी हुबळी येथील गुजरात भवनमध्ये विस्तृत तयारी केली होती.
जोडप्याने २ डिसेंबर रोजी भुवनेश्वरहून हुबळीला बेंगळुरूमार्गे जाण्यासाठी फ्लाईट बुक केले होते, तर काही नातेवाईकांनी भुवनेश्वर-मुंबई-हुबळी अशी एअरलाईन घेतली होती. तथापि, २ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजताची एअरलाईन वारंवार उशिरा सुरू झालीच नाही तर दुसऱ्या दिवशी, ३ डिसेंबर रोजी पहाटे ४-५ वाजता अचानक रद्द करण्यात आली.
A newly wed techie couple forced to attend their own reception online after their Indigo flights from Bhubaneswar-Hubbali were cancelled. The bride’s parents having already invited relatives decided to broadcast their live feed on a big screen. #IndigoDelay #FlightCancellations pic.twitter.com/jO7lTgm8lZ — Deepak Bopanna (@dpkBopanna) December 5, 2025
जोडप्याची अचानक फ्लाईट रद्द झाल्यामुळे दोघेही हुबळीला आपल्या रिसेप्शन पार्टीसाठी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. रिसेप्शन रद्द करण्याऐवजी, कुटुंबाने ते ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्क्रीन लावण्यात आल्या आणि वधू-वरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहुण्यांशी संपर्क साधला. वधूच्या पालकांनी स्टेजवर त्यांची जागा घेतली आणि पाहुण्यांचे स्वागत केले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






