
जनावरांना कळली माया...! रेड्याचं आज्ज्यावर जीवापाड प्रेम, व्यक्तीने पकडून ठेवताच वाचवण्यासाठी धावत पळत आला अन्... Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक व्यक्ती आजोबांना घट्ट पकडून उभा आहे आणि ते दोघेही पलिकडच्या दिशेला कुणाला तरी बघत आहेत. कॅमेरा अँगल दुसऱ्या दिशेला फिरताच आपल्याला तिथे आजोबांचे काही रेडे गवत चरताना दिसून येतात. व्यक्ती आजोबांना त्रास देत आहे असा समज होताच एक रेडा तिथून धावत पळत त्यांच्या दिशेने पळ घेतो. त्याची ही धाव त्याचे आणि आजोबांचे नाते किती गोड आहे, त्याला आजोबांची काळजी आहे हे आपल्याला दाखवून देतो. रेडा रुद्र अवतारात आपल्या दिशेने पळत आहे हे पाहताच व्यक्ती लगेचच आजोबांना सोडतो आणि दूर जाऊन उभा राहतो. रेडाही पुढच्याच क्षणाला आपला वेग कमी करतो आणि आजोबांच्या जवळ जाऊन उभा राहतो. आजोबांनी रेड्याला वेळीच इशारा दिला ज्यामुळे तो तिथेच थांबला आणि व्यक्तीचा जीवही वाचला.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @laughtercolours नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आजोबा नेहमीच आपला सेफ्टी मो़ड चालू ठेवतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांची निष्ठा बघा आणि मानव प्राण्यांशी क्रूरतेने वागतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “येथे आपण त्या माणसाचे कौतुक केले पाहिजे की त्याने प्राण्याला इतके प्रेम आणि माया दिली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.