
ना डाएट, ना व्यायाम... मशीनमध्ये गेला अन् बाहेर येताच व्यक्तीच 40 किलो वजन झालं कमी; धक्कादायक Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
थक्क करणाऱ्या या व्हिडिओमध्ये, एक अनोखी भलीमोठी मशीन दिसून येते. यावेळी इथे एक लठ्ठ माणूस, मशीनचा सहाय्यक आणि काही लोक चमत्कार पाहायला जमल्याचे दिसून येते. व्हिडिओच्या सुरवातीला एक लठ्ठ व्यक्ती मशीनमध्ये जाऊन आपले वजन कमी करण्याच्या तयारीत असतो. तो मशीनमध्ये प्रवेश करतो ज्यानंतर त्याचे गेट बंद होते आणि यातून एक सफेद रंगाचा धूर येऊ लागतो. काही वेळातच हा धूर निघून जातो आणि माणूस मशीनचे दार उघडून बाहेर येतो. लठ्ठ होऊन गेलेला माणूस बाहेर आल्यानंतर मात्र एकदम बारीक आणि फिट बनून बाहेर निघतो. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोकही थक्क होतात.
आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हे नक्की घडलं कसं? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हिडिओमध्ये दिसलेले हे संपूर्ण दृश्य खरे नसून ते AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहे. वास्तविक जीवनात अशी कोणतीही मशीन अस्तित्वात नाही जी तुमचे वजन कमी करू शकेल. मागील काही काळापासून आपल्याला थक्क करणारे आणि वास्तविक वाटणारे अनेक AI व्हिडिओज इंटरनेटवर शेअर करण्यात आले आहेत आणि हा व्हिडिओ देखील त्याचाच एक भाग आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @tap.to__laugh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वजन कमी कारण्यापर्यंत ठीक आहे पण हे केस कुठून आले भाऊ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाप गेला अन् मुलगा बाहेर आला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे हे एआय आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.