(फोटो सौजन्य – X)
काय घडलं व्हिडिओत?
ही घटना उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील लालगंज येथे घडून आली. ओयो हॉटेलमध्ये एक विवाहित महिला शिक्षिकेला तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिकासोबत घेऊन गेली जिथे तिला तिच्याच पतीद्वारे रंगेहात पकडण्यात आलं. सोशल मिडियावर या घटनेच्या व्हिडिओने खळबळ माजवली आहे. माहितीनुसार, पतीला आधीच त्याच्या पत्नीवर संशय होता आणि एके दिवशी त्याने तिचा पाठलाग केला. जेव्हा त्याने त्याच्या पत्नीला मुख्याध्यापिकांसोबत पाहिलं तेव्हा तो संतापला. त्याने तिचे केस धरून रस्त्यावर ओढले आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांनी यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण नवरा काही ऐकायला तयार नव्हता. अनेकांनी या घटनेचे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले आणि याचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला.
A video from #Lalganj, #Pratapgarh, has set social media on fire. It allegedly shows a female instructor from a #Bhetua-area school in #Amethi sitting in a car with the school’s principal, even though both were absent from duty. Rumours quickly spread that they had met outside… pic.twitter.com/a49odUJ9RG — Hate Detector 🔍 (@HateDetectors) December 11, 2025
पिटबुलचा 6 वर्षांच्या चिमुकल्यावर भयानक हल्ला, फरफटत रस्त्यावर ओढलं अन्…थरारक Video Viral
या घटनेदरम्यान, उपस्थित असलेल्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिस येण्यापूर्वीच पती, पत्नी आणि मुख्याध्यापक हे सर्वजण घटनास्थळावरून निघून गेले. दरम्यान, पोलिस व्हायरल व्हिडिओची चौकशी करत आहेत. शिक्षण विभाग मुख्याध्यापक आणि शिक्षकावरही कारवाई करत आहे. शिक्षण विभागाचे पथक दोघेही ड्युटीवर नव्हते की नाही याचा तपास करत आहे. हे करण्यासाठी, ते शाळेतील कर्मचारी, उपस्थिती पुनरावलोकन आणि ड्युटी रेकॉर्ड तपासत आहेत. या घटनेचा व्हिडिओ @HateDetectors नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






