
धुरंधरमधील अक्षय खन्नाच्या स्टाईलमध्ये बापाने साजरा केला मुलीच्या जन्माचा आनंद, स्वतः दिग्दर्शकाने कमेंट करत म्हटलं...Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक लिहिण्यात आले आहे की, “जेव्हा डाॅक्टर सांगतात, मुलगी झाली आहे, तेव्हा माझी रिॲक्शन… “. व्हिडिओ सुरु होताच एक महिला हाॅस्पिटलच्या रुममधून बाहेर येते, तिच्या हातात नुकतीच जन्माला आलेली मुलगी असते आणि तिच्या मागून दोन महिला आनंदाने नाचत असतात. ती मुलीली हातात घेऊन बाहेर पडते तर समोर वडिल नाचत चित्रपटातील स्टेप्स फाॅलो करत आपल्या मुलीचे स्वागत करतो आणि प्रेमाने तिला आपल्या हातात पकडतो. वडिलाचे आपल्या मुलीसाठी असलेले प्रेम आणि अनोख्या स्टाईलमध्ये केलेले तिचे हे स्वागत पाहून अनेकांनी आनंद वाटला आणि लोकांनी हा व्हिडिओ वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली. आणखी एक खास गोष्ट म्हणजे धुरंधर चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री यामी गौतम यांनी स्वतः या व्हिडिओवर कमेंट करत ‘ट्रेंड विनर’ असल्याचे म्हटले.
Winner Of The Trend ❤️🔥 pic.twitter.com/7kvPDO03IM — POSITIVE FAN (@imashishsrrk) December 17, 2025
Hands down, winner 🙏🏻❤️ https://t.co/24M9fEfbyN — Yami Gautam Dhar (@yamigautam) December 17, 2025
दरम्यान हा व्हिडिओ @imashishsrrk नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती गोड व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाळ म्हटलं असेल मी पण धुरंधर पार्ट २ पाहणार” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अखेर गोष्टी सुरळीत झाल्या, सगळेच आनंदी , सगळेच आनंदी नाहीत , प्रत्येक भारतीय जिंकला, यार, या ट्रेंडने अक्षरशः देशद्रोही जाळले आणि राष्ट्रप्रेमींना एकत्र केले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.