(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लग्नाचे विधी सुरु होत असतात. वर प्रेमाने वधूच्या भांगेत कुंकू भरतो त्यानंतर सर्वच गुलाबाच्या पाकळ्या त्यांच्या अंगावर टाकत या विधीचा आनंद साजरा करतात. पण दृष्य तर तेव्हा खास बनते जेव्हा वर भांगेत भरलेल्या कुंकवाचा टिळा आपल्या माथ्यावर लावतो. त्याच्या या कृतीने उपस्थित लोकंच काय तर वधूही त्याच्यावर फिदा होते आणि लगेच तिच्या चेहऱ्यावर एक निखळ हसू उमलत, जे या क्षणाला आणखीन खास बनवतं. वराची ही कृती लहान असली तरी यामागचे प्रेम, आदर आणि समानतेची भावना फार मोठी आहे. काळजी आणि कौतुकाची छोटीशी कृती अनेकदा भव्य हावभावांपेक्षा जास्त बोलकी असते, जी आपल्याला आठवण करून देते की जेव्हा दोन्ही जोडीदार एकमेकांचा आदर करतात आणि त्यांची कदर करतात तेव्हा कायमचे नातेसंबंध फुलतात. ही घटना बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाण्याच्या ओळी सत्यात उतरवताना दिसून येते. या ओळी म्हणजे, “तेरे माथे, तेरे माथे के कुमकुम को, मैं तिलक लगा के घूमूंगा”.
हा व्हायरल व्हिडिओ @oc_.alpha.sp नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला सुंदर कॅप्शन देण्यात आले असून यात लिहिले आहे की, ‘व्हायरल झालेल्या एका हृदयस्पर्शी लग्नाच्या क्षणात, एका वराने “माथे के कुमकुम को…” हे लोकप्रिय गाणे परिपूर्णपणे सत्यात उतरवले. पारंपारिक सिंदूर समारंभात, त्याने केवळ आपल्या वधूच्या भांगेवरचा सिंदूर लावला नाही तर प्रेम, समानता आणि खोडकरपणाचे प्रतीक म्हणून स्वतःच्या कपाळावर त्याचा टिळक लावला. या क्लिपने ऑनलाइन अनेकांचे हृदय जिंकले आहे, तर चाहत्यांनी वराचे विधी संस्मरणीय आणि मजेदार बनवल्याबद्दल कौतुक केले आहे’.
अनेक युजर्सनेही व्हिडिओवर कमेंट्स करत या वरच्या या कृतीवर आपले मत व्यक्त केले. यात एका युजरने लिहिले आहे, “हे कपाळाच्या चुंबनापेक्षाही गोंडस आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाने गाण्यातील ती ओळ गांभीर्याने घेतली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कोणीही काहीही न बोलता, कोणीही काहीही स्पष्ट न करता, कुठूनही न पाहता, सर्व काही तुमच्या मनाने, हृदयाने आणि बुद्धीने केले जाते, ते खूप महत्त्वाचे आहे!”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






