
सीटच्या वादातून जनरल कोचमध्ये गोंधळ; पत्नीला शिवी देताच व्यक्तीने महिलेला केली जबर मारहाण, घटनेचा Video Viral
गेम खेळता खेळता मोबाईल फुटला अन् थोडक्यात वाचला चिमुकलीचा जीव; घटनेचा Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला एक पुरुष आणि महिलेमध्ये जोरदार भांडण होत असल्याचं दिसून येतं. महिला हातात चप्पल घेऊन व्यक्तीसोबत भांडत असते. इथपर्यंत सर्वकाही ठिक असतं पण काही वेळानंतर ती महिला व्यक्तीच्या पत्नीवर निशाणा साधते आणि तिला शिवीगाळ करायला सुरुवात करते. पत्नीवर महिला विनाकारण टिप्पणी करत आहे हे पाहून पतीला राग अनावर झाला आणि त्याने धावत येऊन महिलेच्या कानशिलात बजावली. व्यक्ती बराच काळ महिलेला मारत राहिला ज्यानंतर पत्नीने हस्तक्षेप करत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पुढे इतकं वाढलं की इतर प्रवाशांनाही यात हस्तक्षेप करावा लागला.
Kalesh Inside Indian Railways b/w a Lady Passenger and Guy (A woman kept misbehaving and taunting a young guy for a long time. Finally, fed up, he slapped her hard) pic.twitter.com/5PGEJOuAZo — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 12, 2026
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली आहे. यात लिहिलं आहे की ‘ भारतीय रेल्वेत एक महिला प्रवासी आणि एका पुरुषामध्ये भांडण झालं. महिला बराच वेळ एका तरुणाशी गैरवर्तन करत राहिली आणि त्याला टोमणे मारत राहिली. शेवटी, कंटाळून त्याने तिला जोरात चापट मारली’. घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर तुमचा मुलगा इंजिनिअर असेल तर तुम्ही तुमच्या चप्पलांनी सर्वांना माराल का? जर तुमचा नवरा आणि मुलगा इतके श्रीमंत असते तर तुम्ही त्वरित तिकीट खरेदी करू शकला असता.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती बाई खूप उद्धटपणे बोलली, शिवीगाळ करणाऱ्या चप्पल दाखवल्या, हे सर्व पाहून मुलगा कुठे थांबेल भाऊ?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला बऱ्याच काळापासून त्याची मर्यादा ओलांडताना पाहता तेव्हा शेवटी हेच होत, हे खूप मानवी आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.