(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
स्मार्टफोनचा अतिवापर आपल्यासाठी किती घातक ठरु शकतो ते आपण सध्याच्या व्हायरल व्हिडिओतून पाहू शकतो. व्हिडिओमध्ये, एक लहन मुलगी सोफ्यावर बसलेली दिसते. तिच्या हातात स्मार्टफोन असतो आणि यावर ती व्हिडिओ गेम खेळत असते. सर्वकाही सामान्य वाटत असते पण इतक्यातच अचानक चिमुकलीच्या हातातील फोन ब्लास्ट होतो. स्फोट इतका अचानक होतो की मुलगी घाबरते आणि लगेच फोन फेकून देते आणि तिथून आपला पळ काढते. फोन जमिनीवर पडताच यातून आग निघत असल्याचे दिसते. या घटनेत मुलीला गंभीर दुखापत होऊ शकली असती पण थोडक्यात तिचा जीव बचावला. घटना नक्की कुठली आहे हे तर अद्याप समजलं नाही कॅप्शनमध्ये घटनेची काही माहिती देण्यात आली आहे. यानुसार, ही घटना ९ मार्च रोजी घडली. मुलगी हातात Huawei कंपनीचा फोन घेऊन व्हिडिओ गेम खेळत असताना तो अचानक फोनचा स्फोट झाला.
2026年3月9日,一小女孩在家用华为手机玩游戏,手机出现爆燃。 pic.twitter.com/zL2FyNg2LK — Daniel Fang (@fang_danie121) March 11, 2026
या घटनेचे फुटेज सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून @fang_danie121 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1.5 मिलियन व्युज मिळाल्या आहेत तर हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भयानक. तिच्या स्थितीबद्दल काही माहिती आहे का? असे दिसते की थोडीफार जळाली असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जेव्हा तुम्ही CCP ची अनिवार्य गेमिंग वेळ मर्यादा ओलांडता तेव्हा असेच घडते…” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला वाटतं हे खोटं असून एआयच्या मदतीने याला तयार करण्यात आला आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






