(फोटो सौजन्य: X)
नक्की काय घडलं?
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून ही घटना समोर येत आहे. रस्त्यावर सामान्य वेगाने जाणाऱ्या एका ऑटोरिक्षाचा अचानक अपघात झाला. हा अपघात मानवी चुकीमुळे किंवा वेगामुळे झाला नाही तर यांत्रिक बिघाडामुळे झाला, ज्यामुळे काही सेकंदातच रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला. माहितीनुसार, वर्दळीच्या रस्त्यावर एका रिक्षाचे चाक अचानक निघाल्याने वाहनाचे संतुलन बिघडले आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला डोलू लागले. याचवेळी विरुद्ध दिशेने एक बाईकस्वार येत होता ज्याला ही रिक्षा धडकली. धडक इतकी जोरदार होती की बाईकस्वार रस्त्यावर पडला.
ही घटना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडली. चालत्या ऑटोरिक्षाचे चाक निघाल्याने नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. ऑटोरिक्षाला समोरून येणाऱ्या एका दुचाकीला थेट धडक दिली. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.#auto #accident #maharashtra pic.twitter.com/5LvQ2nBo63 — Ramraje Shinde (@ramraje_shinde) March 11, 2026
अपघातानंतर लगेचच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नीही. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिक्षाच्या देखभालीमध्ये काही निष्काळजीपणा झाला आहे का हे शोधण्यासाठी स्थानिक पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @ramraje_shinde नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






