
बाप असावा तर असा...! सासरी छळ होतो म्हणून वडिलांनी वाजत-गाजत मुलीला आणलं माहेरी, पाहून युजर्सनेही केले कौतुक; Video Viral
काय आहे प्रकरण?
घटना झारखंडमधील रांचीमधून समोर येत आहे. येथील रहिवासी प्रेम गुप्ता यांनी त्यांची मुलगी साक्षी गुप्ता हिचे लग्न मोठ्या थाटामाटात केले होते. तथापि, लग्नापासून साक्षीच्या सासरचे तिचा छळ करत होते. जेव्हा कुटुंबाला हे कळले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीला सासरच्या जाचातून बाहेर काढत पुन्हा घरी आणण्याचा निर्णय घेतला. समाजाचा विचार न करता मुलीच्या आनंदाला प्राधान्य देणं प्रत्येक पालकाला जमत नाही, ज्यामुळे साक्षीच्या पालकांचा हा निर्णय खरोखरच प्रशंनीय आहे .
साक्षीच्या वडिलांनी म्हटले की, मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते आणि जर जोडीदार आणि कुटुंब विश्वासघातकी ठरले किंवा चुकीचे निघाले तर त्यांच्या लाडक्या मुलीला त्याच आदराने आणि सन्मानाने घरी परत आणले पाहिजे. कारण मुली मौल्यवान असतात. हा संदेश समाजाची विचारसरणी नक्कीच बदलेल. साक्षी म्हणाली की तिने हार मानली नाही आणि त्यांचे नाते वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सध्या तिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या पुरूषाने पोटगी देण्यास सहमती दर्शविली आहे. घटस्फोट लवकरच कायदेशीररित्या अंतिम होण्याची अपेक्षा आहे.
या घटनेचा व्हिडिओ @latentindian नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सर्वाेत्तम बाबा, प्रत्येक मुलीला असे वडिल मिळायला हवेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी कधीही रील्सवर कमेंट करत नाही, पण हे पाहिल्यानंतर मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. याला म्हणतात बाबा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काकांना सलाम, देव त्यांना आणि त्यांच्या मुलीला आशीर्वाद देवो ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.