किंग कोब्राने ओकले एकामागून एक 3 साप, रस्त्यावरील भयाण दृश्य पाहून सर्वच झाले थक्क, Video Viral
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, परंतु काही व्हिडिओ त्यांच्या एका वैशिष्ट्यामुळे आपल्या लक्षात राहतात. अनेक वेळा हे व्हिडिओ आपल्या जीवनाशी किंवा प्राण्यांशी संबंधित असतात. यातील अनेक व्हिडिओज फार भयाण असतात, ज्यांना पाहून आपण थक्क होतो. सध्या असाच एक व्हिडिओ ओसशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक साप एक-दोन नव्हे अवघे तर तीन गिळलेल्या सापांना आपल्या तोंडातून बाहेर काढताना दिसून येत आहे. चालू रस्त्यावरील हे दृश्य पाहून अनेकजण आवाक् झाले आहे.
किंग कोब्रा आपल्या शिकारीसाठी ओळखला जातो, तो जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत प्राणीच काय तर माणसंही यांच्या जवळ जाण्याची हिंमत करत नाही. नुसते कोब्राचे नाव ऐकले तरी अनेकांना भीतीने घाम फुटू लागतो आणि तो समोर पाहून तर काहींचा थरकाप देखील उडतो. सोशल मीडियावर कोब्राचे अनेक थरारक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज पाहून अनेकजण दंग होऊन जातात. सध्या असाच एक हैराण करणारा किंग कोब्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
हेदेखील वाचा – मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! स्कुटरवर आला हृदयविकाराचा झटका तितक्यात देवदूत … धकाकदायक Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते कोणाचीही अवस्था बिघडवण्यास पुरेसे आहे. या धक्कादायक व्हिडिओमध्ये, एक किंग कोब्रा रस्त्याच्या मधोमध एक एक करून तीन साप आपल्या तोंडातून थुंकताना दिसत आहे, जे त्याने आधी गिळले होते. हे भयानक दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही थक्क झाले. किंग कोब्राची क्रूरता पाहून लोक खरोखरच घाबरले. काही धाडसी लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आणि याची क्लिप सोशल मीडियावर शेअर केली.
A King cobra regurgitating three other snakespic.twitter.com/fCSqFpq6yr
— Massimo (@Rainmaker1973) October 17, 2024
हेदेखील वाचा – Video Viral: कुटुंबीय येताच प्रेयसीने प्रियकराला लपवले पेटीत, काही वेळाने पेटी उघडली अन्… पाहून सर्वांनाच बसला धक्का
कोब्राचा हा व्हिडिओ @Rainmaker1973 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 2 लाख 90 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी कमेंट्समध्ये व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “चव आवडली नाही की काय?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कदाचित तो ते पचवू शकत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप भयानक होते”.