(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस रिक्षात चढाताच त्याला बॅक सीटवर एक चिमुकली झोपल्याचे दिसून येते. जेव्हा व्यक्ती रिक्षाचालकाला मुलीविषयी विचारतो तेव्हा तो सांगतो की, ती माझीच मुलगी आहे आणि ती नेहमीच त्याच्यासोबत रिक्षात असते. रिक्षाचालकाने स्पष्ट केले की, तो एक बाप आहे आणि पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी तिला स्वत:सोबत ठेवायला सुरुवात केली आहे. दिवसभर तिला आपल्यासोबत ठेवतो. आयुष्यात प्रचंड अडचणी असूनही यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य असतं जे अनेकांच्या काळजाला भिडतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की जर आई होणे सोपे नसेल तर वडील होणे देखील सोपे काम नाही.
मिलिए इस ऑटो ड्राइवर से, जो एक सिंगल पेरेंट है..!!! इस व्यक्ति के पत्नी का देहांत हो गया और तब से वह अपनी छोटी बेटी को हर जगह साथ लेकर घूमता है — रोज़ी-रोटी कमाता है और अकेले ही उसकी परवरिश करता है। एक पुरुष होना भी आसान नहीं है 💔 pic.twitter.com/wE5iUKgpfG — Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) February 9, 2026
हा व्हिडिओ @Sheetal2242 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आपल्या मुलीला इतक्या प्रेमाने वाढवणारा संवेदनशील बाप, एक जबाबदार बाप, तुम्हाला सलाम, अशी मुलगी भाग्यवान असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ तुम्ही चुकीचे म्हणत आहात, मग तुम्ही वडील असोत, आई असोत किंवा भाऊ असोत, “एक जबाबदार व्यक्ती असणे इतके सोपे नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वडिलांचे आयुष्य संघर्षाने भरलेले असते!”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






