
भाजीवाल्याचा मुलगा झाला CRPF मध्ये भरती, धावत पळत आला अन् आईच्या मिठीतच फुटला अश्रूंचा बांध; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
महाराष्ट्रातील शेतकरीवाडी येथे राहणारा गोपाळ सावंत पोलिस दलात भरती झाला. त्याची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रसत्यावर बसून भाजी विकण्याचे काम करत होती. व्हिडिओमध्ये मुलगा आईच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिला आनंदाची बातमी सांगताना दिसतो. आपला मुलगा देशसेवेसाठी निवडला गेला आहे, तेव्हा तिचे डोळे अश्रूंनी भरून येतात. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि आलेल्या यशाचा आनंद साजरा करतात. गरीबीतून अथक प्रतत्नानंतर गोपाळच्या हाती जे यश आले ते खरंच उल्लेखनीय आहे. गोपाळच्या या यशावरून आपल्याला समजते की, आपण केलेले कष्ट हे कधीच वाया जात नाहीत. कष्ट केले की त्याचे फळ एकेदिवशी नक्कीच मिळणार.
पाकिस्तानी भारतीयांबाबत काय करतात विचार?महिलेच्या वक्तव्याने पडली वादाची ठिणगी, VIDEO VIRAL
दरम्यान हा व्हिडिओ @peektv_in नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “देव तुम्हाला अधिक आशीर्वाद देवो. खूप खूप शुभेच्छा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो भाग्यवान आहे की त्याला त्याच्या आईसोबत हा क्षण मिळाला. बऱ्याचदा यश तेव्हा मिळते जेव्हा आपले पालक आजूबाजूला नसतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कलर टाकायला नव्हता पाहिजे, बाकी सगळं ठिक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.