
इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral
या व्हिडिओला लेक्स फ्रिडमन पॉडकास्टवर दाखवण्यात आले आहे. व्हिडिओत पेरुव्हियन अमेझॉन प्रदेशात राहणारे माशको पिरो जमातीचे योद्धे दाखवण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये, जमातीचे सदस्य नदीकाठावर शस्त्रे घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. व्हिडिओतील दुसऱ्या दृश्यांमध्ये जमात नदीतील बोटीत ठेवलेली केळी धावत पळत येऊन घेताना दिसून येतात. पॉल रोसोलीच्या मते, हे फुटेज या जमातीच्या जीवनशैली आणि वर्तनाचे आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट आणि अभूतपूर्व दृश्य आहे.
NEW: Never-before-seen footage of an uncontacted Amazonian tribe has been released by author Paul Rosolie on Lex Fridman’s show. The tribe was seen lowering their weapons before they were given a canoe of food. Rosolie is a conservationist who has reportedly spent two decades… pic.twitter.com/a0WF9O2Pof — Collin Rugg (@CollinRugg) January 16, 2026
व्हिडिओमध्ये जमातीचे वेगवेगळे क्लिप्स दाखवण्यात आले आहेत ज्यातून त्यांचे राहणीमान कसे असेल यावर अंदाज लावता येऊ शकतो. संशोधनाचा असा अंदाज आहे की, अशा एकूण २०० हून अधिक जमाती आहेत ज्यांच्याशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकला नाही. या जमाती पेरु आणि ब्राझीलच्या अमेझॉन वर्षावनात राहतात. अमेझॉनमध्ये जाणे धोकादायक असल्याने त्यांची माहिती सॅटेलाईट इमॅजिरी, एरिअल सरविलंस आणि शेजारील आदिवासी गटांच्या अहवालांमधून मिळते. अशा जमातींना थेट भेटणं धोकादायक ठरु शकते कारण ते बाहेरील कोणत्याही व्यक्तीला पाहताच त्याच्यावर हल्ला करतात. अमेझॉनच्या घनदाट जंगलात आजही मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेले जीवन फुलत आहे. या दुर्मिळ जमातींचे दर्शन आपल्याला निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करतं, कारण हे जंगल आणि इथले लोक दोघेही पृथ्वीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.