Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या वरळी सी फेसवर दिसला समुद्राचा सर्वात सुंदर मासा… ‘डॉल्फिन’, पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी; अद्भुत Video Viral

मुंबईकरांसाठी खास क्षण! पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा डॉल्फिनचे भारतात आगमन, वरळी सी फेसवर दिसला माशांचा अद्भुत खेळ. अनेकांनी हे दृष्य इंटरनेटवर शेअर केले असून याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 20, 2025 | 10:10 AM
मुंबईच्या वरळी सी फेसवर दिसला समुद्राचा सर्वात सुंदर मासा... 'डॉल्फिन', पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी; अद्भुत Video Viral

मुंबईच्या वरळी सी फेसवर दिसला समुद्राचा सर्वात सुंदर मासा... 'डॉल्फिन', पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी; अद्भुत Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तब्बल ५ वर्षांनंतर मुंबईच्या समुद्रात डॉल्फिनचा सुंदर नजारा पाहायला मिळाला.
  • एकत्र पोहताना आणि पाण्यात उड्या मारताना दिसणाऱ्या डॉल्फिनचा व्हिडिओ समोर आला आहे.
  • जर्सनी मजेशीर कमेंट्स करत डॉल्फिनच्या आगमनाचे मनापासून स्वागत केले.
महाराष्ट्राची आर्थक राजधानी मुंबई स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते. मुंबई पाहण्यासाठी जगभरातून लोक इथे येतात. असेच काही परदेशी मुंबईत दाखल झाल्याचे अद्भूत दृष्य आता सोशल मिडियावर ट्रेंड होत आहेत. कोरोनानंतर हे पाहूणे तब्बल पाच वर्षांनी मुंबईत दाखल झाले त्यांच्या आगमनाने मुंबईकर खुश झाले. हे पाहुणे म्हणजे डॉल्फिन मासा जो भारतात फार कमी ठिकाणी आढळला जातो. मुंबईच्या वरळी सी फेसवर पाण्यात डॉल्फिनचा सुंदर नजारा पाहायला मिळाला. लोकांनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात लगेच कैद केले आणि याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

‘बाबा… बाबा…’ दीड वर्षांच्या मुलीची शहिद वडिलांना हाक, हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही डॉल्फिन एकत्र पाण्याची मजा लुटताना, पोहताना दिसून आल्या. हे दृष्य मनाला सुखावणारं होतं. त्यांच्या या अनपेक्षित आगमनाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. व्हिडिओची सुरुवात समुद्रकिनाऱ्याच्या एका काँक्रीटच्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांच्या गटाने होते. ते आत झुकतात आणि पाण्यात पाहतात, बोट दाखवतात आणि उत्सुकतेने पाहत राहतात. गर्दीपासून कॅमेरा दूर जाताच, आपल्याला पाण्यात डॉल्फिनचा एक छोटा गट एकत्र पोहताना दिसतो. पाण्यात डॉल्फिन आणि पाण्याच्या वर उडणारे पक्षी हे या दृष्यांना आणखीनच सुंदर बनवतात. लोकांनी आता या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत भारतात परतलेल्या डॉल्फिनचे मनापासून स्वागत केले आहे तर काहींनी त्यांच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला आहे.

भक्तीला शब्दांची गरज नसते! हत्ती झाला गणपतीच्या चरणी लीन, चक्क सोंडेने ताट उचलत केली आरती; अद्भुत Video Viral

हा व्हिडिओ @savinchauhan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मुंबईकर डॉल्फिनच्या आश्चर्यकारक भेटीचे साक्षीदार बनले’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “डॉल्फिन देखील धुरंधर बघायला आला वाटत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “डॉल्फिन विचारात असेल की मेस्सी आला का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांना वाटलं आपण दुबईला येतोय पण हबीबी नाहीये, हे मुंबई वरळी आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral of dolphin spotted in mumbai worli sea face viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 10:10 AM

Topics:  

  • dolphin
  • viral news
  • viral video
  • worli

संबंधित बातम्या

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’!  राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप
1

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’! राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
2

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
3

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
4

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.