
धुरंधरच्या नशेत पाकिस्तान झालं वेडं, व्हायरल गाण्यावर लाहोरच्या पोलीस अधिकाऱ्याने केला डान्स; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
पाकिस्तानच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने एक नाही तर अनेक व्हिडिओ अपलोड केले ज्यात ती अक्षय खन्नाची भूमिका, रेहमान द डकैतीचा रोल साकारत वाईब करताना दिसली. व्हिडिओमध्ये, ती अधिकारी धुरंधरच्या गाण्यावर तिच्या स्टाईलचा आनंद घेताना दिसली. तिने एका वीर शैलीत तिच्या खांद्यावर काळी शाल घातली आणि स्टाईलमध्ये पोज देऊ लागली. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असा दावा केला आहे की, महिला पाकिस्तानच्या लाहोर येतील पोलीस अधिकारी आहे. ही महिला खरोखर पोलिस अधिकारी आहे की नाही हे सोशल मीडियावर स्पष्ट नाही. तथापि, एका कमेंटमध्ये असा दावा केला आहे की तिला गेल्या वर्षी पोलिस दलातून काढून टाकण्यात आले होते.
Lahore Police vibing on Dhurandar’s music. pic.twitter.com/qQbxsR6IZM — THE UNKNOWN MAN (@Theunk13) December 25, 2025
हा व्हिडिओ @Theunk13 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एका व्हिडिओमध्ये तिने टिळक देखील लावला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खोटे बोलणार नाही, हा पोलिसांचा गणवेश खूपच वाईट दिसतोय. आपण अजूनही हा वसाहतकालीन खली गणवेश का घालतो हे मला कळले नाही.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असा वाटते की, एक टिकटॉकर आहे जिने पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश घातला आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.