Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाकडं रचली, आग लावणार तितक्यात चितेवरून उचललं पार्थिव, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं शरीर अन् पुढे जे घडलं… Video Viral

OMG Video : अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक चितेवरून पार्थिव उचलून रुग्णवाहिकेत नेल्याचा धक्कादायक प्रकार शिवपुरी येथे घडून आला आहे. याचा व्हिडिओ समोर आला असून असं कारण्यामागचं नक्की कारण काय ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 18, 2026 | 10:09 AM
लाकडं रचली, आग लावणार तितक्यात चितेवरून उचललं पार्थिव, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं शरीर अन् पुढे जे घडलं... Video Viral

लाकडं रचली, आग लावणार तितक्यात चितेवरून उचललं पार्थिव, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं शरीर अन् पुढे जे घडलं... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • शिवपुरी येथील मुक्तिधाममध्ये अंत्यसंस्कार सुरू असताना वन विभागाच्या पथकाने चितेवरील मृतदेह तातडीने ताब्यात घेतला.
  • या अनपेक्षित कारवाईमुळे स्मशानभूमीत काही काळ गोंधळ निर्माण झाला.
  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
हिंदू धर्मानुसार, कोणच्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधिपूर्वक त्याचे अंतिमसंस्कार केले जातात. असं केल्याने व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे. दरम्यान अलिकडेच एक खळबळजनक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एका व्यक्तीच्या पार्थिवाला विधींदरम्यान चितेवरुन उचलून रुग्णवाहिकेत नेण्यात आल्याचे दिसून आले. आता असं का घडलं आणि पार्थिवाला चितेवरुन का उचलण्यात आलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. घटनेत नक्की पुढे नक्की काय घडलं ते आज आपण या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

काय आहे प्रकरण?

शिवपुरीच्या मुक्तिधाममध्ये एका अंत्यसंस्काराच्या वेळी अचानक वन विभागाचे पथक आले आणि त्यांनी चितेवरील मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत नेण्याची घाई केली. खरंतर घडलं असं की, मृत झालेला तो व्यक्ती वन विभागाचा कर्मचारी होता ज्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. सरकारी प्रक्रिया आणि फायदे सुनिश्चित करण्यासाठी शवविच्छेदन आवश्यक असल्याचे विभागाने म्हटले आहे आणि म्हणूनच मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चितेवरुन उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बनवारीलाल रजक नावाचा एक माणूस वन विभागात तैनात होता. सोमवारी दुपारी तो एका सहकारी वन कर्मचाऱ्यासोबत दुचाकी चालवत होता . मायापूर पोलिस स्टेशन परिसरातील रनौद रोडवरील राजापूर गावाजवळ, दुचाकी अनियंत्रित झाली आणि दोघेही पडले. बनवारीलाल गंभीर जखमी झाले आणि त्यांना ताबडतोब शिवपुरी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले . त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहाला घरी पोहचवल्यानंतर कुटुंबियांनी प्रशासनाला न कळवताच अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. जेव्हा वनविभागाला याविषयी समजले तेव्हा कर्माचारी ताबडतोब स्मशानभूमीत पोहोचले. त्यांनी मृतदेह चितेवर रोखला आणि शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात नेला.

वन विभागाचे अधिकाऱ्यांनी म्हटले की, मृत व्यक्ती हा बनवारीलाल एक सरकारी कर्मचारी होता. त्यामुळे विभागीय लाभ, विमा, आर्थिक मदत आणि इतर कायदेशीर प्रक्रियांसाठी शवविच्छेदन अनिवार्य आहे. जर शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार केले गेले असते तर कुटुंब अनेक सरकारी लाभांपासून वंचित राहू शकले असते. अचानक झालेल्या या कारवाईमुळे स्मशानभूमीत गोंधळ माजला परंतु अधिकाऱ्यांनी लेगचच कुटुंबियांनी सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. नंतर कुटुंबाने विभागाची कारवाई योग्य असल्याचे मान्य करत सहकार्य केले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral forest department take dead body from pyre viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
1

सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई
2

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही
3

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL
4

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.