
धुरंधरच्या FA9LA गाण्यावर पाकिस्तानच्या बलोच लोकांनी केला जबरदस्त डान्स; स्टेप्स पाहून युजर्स झाले इम्प्रेस; Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
FA9LA गाण्यावर खऱ्या बलुची पुरुषांचा डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक टाळ्यांच्या कडकडाटात खांदे हलवत नाचत आहेत. अक्षय खन्नाच्या डान्स मूव्हजपेक्षा या मूव्हज थोड्या वेगळ्या हेत, पण त्यांच्या डान्स मूव्हज आणि एनर्जीने यूजर्सना चांगलंच इम्प्रेस केलं. गाण्याच्या बीटवर ते सुंदर नृत्य सादर करतात. बॅकग्राउंडमध्ये FA9LA हे गाणं वाजत असतं आणि पुरुष बीटच्या तालावरच नाचू लागतात. व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ खऱ्या बलुच लोकांचा FA9LA या गाण्यावर नाचतानाचा आहे. तथापि, व्हिडिओमधील लोक खरोखर FA9LA या गाण्यावर नाचत होते की हे गाणे नंतर एडिट केले गेले आहे याची पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
“FA9LA” हे गाणे बहरीनचा प्रसिद्ध रॅपर Flipperachi याने गायले आहे. त्यांचे खरे नाव हुस्सम असीम आहे. त्यांनी हे गाणे केवळ गायलेच नाही तर ते लिहिले आणि संगीतबद्धही केले आहे. हे एक अरबी गाणे आहे, ज्याची चाल आणि ऊर्जा लोकांना नाचायला लावते. “FA9LA” हे गाणे बहरीनचे प्रसिद्ध रॅपर फ्लिप्पेराची यांनी गायले आहे. त्यांचे खरे नाव हुस्सम असीम आहे. त्यांनी हे गाणे केवळ गायलेच नाही तर ते लिहिले आणि संगीतबद्धही केले आहे. हे एक अरबी गाणे आहे, ज्याची चाल आणि ऊर्जा लोकांना नाचायला लावते. या गाण्यात अक्षय खन्ना आपण यापूर्वी कधीही पाहिलेल्यापेक्षा वेगळ्या शैलीत दिसतो. त्याचे भाव आणि देहबोली गाण्याचा अर्थ अधिक दृढ करतात.’
हा व्हिडिओ @faz3 नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सर्वाेत्तम बाबा, प्रत्येक मुलीला असे वडिल मिळायला हवेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी कधीही रील्सवर कमेंट करत नाही, पण हे पाहिल्यानंतर मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. याला म्हणतात बाबा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काकांना सलाम, देव त्यांना आणि त्यांच्या मुलीला आशीर्वाद देवो ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.