
प्लास्टिक टाकणे थांबवा! तरुणीने 20 फूट खोल पाण्यात भरतनाट्यम सादर करत दिला संदेश; कलेचे अद्भुत सादरीकरण अन् Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल असलेलया या व्हिडिओमध्ये थरगाई अरथना नावाची ही तरुणी, एक नृत्यांगना आणि डायव्हर आहे. ती सुमारे २० फूट पाण्याखाली भरतनाट्यम सादर करत जनतेला अनोखा संदेश देते. यावेळी तिने पारंपारिक भरतनाट्यम पोशाख परिधान केला आहे, जो दागिने आणि मेकअपने परिपूर्ण आहे, प्लास्टिक प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तिने जमिनीवरील स्टेजऐवजी समुद्राची खोली निवडली. हा व्हिडिओ मे महिन्यात टेल माय स्टोरीने शेअर केला असला तरी, तो पुन्हा एकदा इंटरनेटवर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त, थरगाईने बंगालच्या उपसागरातील रामेश्वरमजवळ पाण्याखाली भरतनाट्यम सादर केले. तिने शास्त्रीय नृत्याच्या मदतीने प्लास्टिक कचऱ्यामुळे सागरी जीव आणि समुद्रातील परिसंस्थांना होणाऱ्या नुकसानाबद्दल जागृती निर्माण केली.
क्लिपमध्ये, थरगाईने शेअर केले, “तर आम्ही प्लास्टिकबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पारंपारिक भरतनाट्यम पोशाख घालून पाण्याखाली नृत्य केले आहे.” पाण्यात बुडालेले असूनही आणि संगीत ऐकू येत नसतानाही, तिची लय अचूक होती आणि तिने साई पल्लवीच्या श्याम सिंघा रॉय चित्रपटातील प्रणवलय या गाण्यावर नृत्य सादर केले.
हीच खरी श्रीमंती! कामावरुन परतेल्या वडीलांचे मुलीनं केलं गोड स्वागत, क्षणात थकवा गायब; VIDEO VIRAL
याचा व्हिडिओ @oc_.alpha.sp नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “देशाची मुलगी आणि हिच खरी प्रेरणा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे फेक आहे, २० फूट खोल पाण्यात तुम्हाला नाचता येणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मी याची प्रशंसा करतो पण समुद्राखाली जाऊन हे असं करण्याची गरज नव्हती, ते धोकादायक ठरु शकते ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.