
अरे ताऊ तेरी छोरी की उम्र की हूं मैं...! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्या दर्शकांवर भडकली हरियाणवी डान्सर; Video Viral
बचाव मोहिम फसली! बिबट्याला वाचवायला गेले अन् स्वतःच विहरीत पडले, मग शिकाऱ्याने जे केलं… Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
प्रांजल दहियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक इंस्टाग्राम स्टोरी अपडेट केली आणि लिहिले की, “तुमचे पात्र कितीही स्वच्छ असले तरी ते फक्त त्यांच्या घरात काय घडते याचाच विचार करतात.” वापरकर्ते या पोस्टला अलीकडील घटनेशी जोडत आहेत. प्रांजल दहिया हे हरियाणातील एक प्रसिद्ध नाव आहे आणि तिने हरियाणातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या स्टारसोबत म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. अलीकडेच एका कार्यक्रमात तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती स्टेजच्या खाली उभ्या असलेल्या प्रेक्षकांमधील काही लोकांना डाफरताना दिसत आहे.
प्रांजल म्हणते, “थोड्या आदराने वागा, कारण इथे कोणाची तरी बहीण किंवा मुलगी उभी आहे, आणि ताऊ तू…तेरी छोरी की उम्र की हूं मैं हां, काळ्या जॅकेटमध्ये असलेले, तुम्ही थोडे नियंत्रणात राहा.” तिने इतर प्रेक्षकांना कलाकारांना सहकार्य करण्याचे आवाहनही केले. ती म्हणाली, “सर, कृपया थोडा वेळ स्टेजपासून दूर राहा, आमचा परफॉर्मन्स अजून बाकी आहे. मोकळेपणाने आनंद घ्या, पण कृपया आमच्याशीही थोडे सहकार्य करा.” खरं तर, शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान, स्टेजवर उपस्थित असलेल्या काही लोकांनी प्रांजल दहियाशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. प्रांजलने शोच्या मध्यभागी त्या लोकांना फत्करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व प्रेक्षकांना खडेबोल सुनावले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @eshran75583 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.