
1.5 लाखांचा पराठा? चिमुकल्याला डबा सापडला नाही म्हणून iPhone च्या बॉक्समध्ये घेऊन गेला टिफिन, शिक्षकांची प्रतिक्रिया पाहाल तर...
काय घडलं व्हिडिओत?
हा व्हिडिओ एका क्लासरूमचा आहे, जिथे एक छोटा मुलगा iPhone चा बॉक्स घेऊन बसलेला दिसतो. लहान मुलाच्या हातात आयफोनचा बॉक्स पाहून शिक्षक आश्चर्यचकित होतात. त्यांना वाटत की, मुलगा आपल्या घरातून महागडा फोन शाळेत घेऊन आला आहे. अन पुढे घडतं काही भलतंच. शिक्षक जेव्हा मुलाला आपल्याजवळ बोलावून विचारतात की त्याच्याकडे काय आहे, तेव्हा तो गोड हसत सांगतो की, या बॉक्समध्ये त्याचा पराठा आहे. म्हणजेच, परंपरागत टिफिन बॉक्सच्या ऐवजी त्याने मोबाइलचा बॉक्स लंच बॉक्स म्हणून वापरलेला आहे.
मुलगा बॉक्स ओपन करून त्यात ठेवलेला पराठा दाखवतो ज्यानंतर सर्वांनाच त्याची ही खोडसर मस्ती समजते. शिक्षकांचा गोंधळही यानंतर दूर होतो. पुढे शिक्षण विद्यार्थ्याला विचारते की, याला कोणी पॅक केलं? तर मुलगा सांगतो की त्यानेच स्वतः हा पराठा बॉक्समध्ये ठेवला आहे. जेव्हा टीचर त्याला विचारते की असं का केलं, तर तो मुलगा स्मितहास्य देतो आणि गप्प बसतो. चिमुकल्याचा हा पराक्रम आता इंटरनेटवर सर्वांनाच हसवत असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर @bharatneedsfacts नावाच्या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 40 हजाराहून अधिकचे व्युज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “मुलांचे रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याची परवानगी शिक्षकांना कोण देते?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “आलू पराठा प्रो मॅक्स” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याच्याकडे आयफोन आहे असं त्याला इतरांना दाखवायचं म्हणून त्याने क्लासरूममध्ये बॉक्स आणला असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.