(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
या व्हायरल व्हिडिओमध्ये, तरुण आपलं दुःख व्यक्त करताना म्हणतो की, “तीन दिवसांपूर्वी मी माझी नोकरी सोडली आणि घरी आलो. मी पूर्वीही घरी गेलो आहे, आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी घरी जात असे, तेव्हा आई विचारायची, ‘२ चपात्या आणू का?’ ती भावना वेगळीच असते, कारण ‘मुलगा कमवत असतो’ म्हणून ती विचारायची. पण तीन दिवसांपासून घरी बसून आहे आणि कोणतीही नोकरी मिळत नाही, तर काल बाबा असं म्हणाले, ‘आता २ चपात्या मागतोय, त्याला २ चपात्या दे.’ मला ते खूप वाईट वाटलं, कारण जेव्हा मी नोकरी करत होतो, तेव्हा मला इज्जत होती, आणि जेव्हा माझ्याकडे नोकरी नाही, तेव्हा मला ती इज्जत नाही.”
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील @director_dayal या अकाउंटवर पोस्ट केला गेला असून याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गरीब मुलगा तर आई-वडिलांना देखील आवडत नाही.” या व्हिडिओला १ लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत तरुणाच्या या व्हिडिओवर आपले मत व्यक्त केले. एका युजरने लिहिले, “बरोबर आहे भावा,” तर दुसरा यूजर म्हणतो, “भाऊ, काळ आवाक्यात आहे, तो निघून जाईल.” एक तिसरा यूजर म्हणतो, “हे कटू सत्य आहे भावा, तू स्ट्रॉंग रहा आणि लढत रहा.” आणखीन एकाने लिहिलं, “समाज असाच असतो, कोणीही कायम तुझ्या सोबत नाही.”
या व्हिडिओमध्ये त्या युवकाने जो मुद्दा मांडला आहे, तो एक गंभीर सामाजिक सत्य आहे. जरी आपल्याकडे पैसा किंवा नोकरी असली, तरी समाजात इज्जत आणि स्थान मिळवण्यासाठी त्या गोष्टींचा फार मोठा प्रभाव असतो. ज्या दिवशी आपल्याकडे नोकरी नसते किंवा आपले आर्थिक स्थिती खराब असते, तेव्हा इतरांचा दृष्टिकोन आपल्याबद्दल बदलतो. या व्हिडिओने खरंतर एक मोठा संदेश दिला आहे, जो प्रत्येकाने लक्षात घ्यावा.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






