
जंगलाच्या राजाने खाल्ला कुत्र्याचा मार, जबडा पकडून असा खेचला की वेदनेने सिंहही हादरला; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये हा पाळीव कुत्रा निर्भयपणे सिंहावर हल्ला करताना दिसत आहे. त्याने थेट दातांनी सिंहाचा जबडा पकडला आणि घट्ट दाबला. त्याची पकड इतकी मजबूत होती की सिंहाची इच्छा असूनही तो स्वतःला सोडवू शकला नाही. काही सेकंदांसाठी असे वाटले की सिंह कुत्र्याला घाबरला आहे. हे दृश्य पाहून गाडीत बसलेले पर्यटक एकीकडे घाबरले आणि दुसरीकडे हसायला लागले, त्यांना आश्चर्य वाटले की जंगलाचा इतका मोठा राजा पाळीव कुत्र्यासमोर इतका असहाय्य कसा दिसू शकतो. सिंह वारंवार डोके हलवत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत राहिला, पण कुत्रा मागे हटायला तयार नव्हता. हा व्हिडिओ आता इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. यातील दृश्य थक्क करणारे असले तरी सत्य परिस्थितीत असे घडून येणे थोडे कठीण आहे. सिंहासारखा बलाढ्य प्राणी एका पाळीव प्राण्यापासून पराभूत होणे अत्यंत दुर्मिळ आहे. हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार केला असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
हा व्हायरल व्हिडिओ @a_kreacts नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी सिंह समाजावर थुंकतो मित्रा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पिटबुल कुत्र्याशी पंगा नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे वेड्या तो एआय आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.