(फोटो सौजन्य – X)
काय घडलं व्हिडिओत?
दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये हा सर्व प्रकार घडून आला.दोन मुलांमधील एका साध्या विनोदाने वादळ निर्माण केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दिसत आहे की लिफ्टमध्ये मुलाने एंटर करताच मागून दुसरा मुलगा त्याला टपली मारतो आणि लगेच आपल्या मोबाईलमध्ये बघून जणू काही झालंच नाही असं भासवण्याचा प्रयत्न करतो. पण मुलाला हे कोणी केलं असेच याचा सुगावा लागतो आणि तो क्षणाचाही विलंब न करता त्याला मारहाण करण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉस्पिटलच्या ओपीडी सेक्शनमध्ये दोन तरुण लिफ्टमध्ये चढले. एकाने “मस्करी” म्हणून दुसऱ्याला टपली मारली किंवा काही खेळकर हावभाव केला असा आरोप आहे. तथापि, त्याच्या समोर उभ्या असलेल्या माणसाला ते सहन झाले नाही आणि त्याने लगेच प्रत्युत्तर दिले. तो माणूस संतापला आणि त्याने लिफ्टच्या आतच त्याला मारहाण करायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये निळ्या गणवेशातील सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे, परंतु कोणीही मागे हटले नाही. तथापि, इतर लोकांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना अखेर वेगळे करण्यात आले.
Kalesh b/w Two bois inside Lift over small prank
pic.twitter.com/uzlxGROpcJ — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 22, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लोकांना एकमेकांना दुखवण्यासाठी फक्त एक छोटेसे निमित्त हवे असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फक्त उत्सुकता आहे.. सुरक्षा रक्षकाचे काम काय असते?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे प्रँकच वेड जरा जास्तच वाढत चाललंय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






