(फोटो सौजन्य – X)
काय घडलं व्हिडिओत?
बैल हा एक असा प्राणी आहे जो आपल्या शिंगांनी समोरच्यावर हल्ला करतो. त्याचा हल्ला फार जबरदस्त असतो आणि आपल्या संपूर्ण शक्तीचा वापर करून तो त्यांच्या शिंगांनी हल्ला करतो. व्हायरल होत असलेल्या या फाईटमध्ये दोन बैल एकमेकांविरुद्ध भिडल्याचे दिसून आले. दोघेही भररस्त्यात आमने-सामने आले आणि आपल्या शिंगांनी एकमेकांवर हल्ला करू लागले. त्यांची लढाई अधूनमधून सुरू असते. रस्त्यावर ट्राफिक असल्याने प्रत्येक गाडीच्या समोर जाऊन ते हल्ला करू लागले. हल्ला करता करताच ते धावत पळत दुसऱ्या ठिकाणी जायचे आणि परत त्या ठिकाणी थांबून हल्ला करायचे. आता असं का याच कारण तर बैलांनाच ठाऊक असावं. व्हिडिओत अनेकजण त्यांच्या मागे धावत धावत त्यांची ही झुंज पाहताना दिसून आले. आता बैलांच्या या फाईटमध्ये नक्की कोण जिंकलं ते सांगणं कठीण आहे कारण व्हिडिओच्या शेवटपर्यंत ते दोघेही लढत होते.
दिल्ली कैंट जैसे VVIP इलाके में दो सांड खुल्लम खुल्ला लड़ रहे। ये हाल है देश की राजधानी के वीवीआईपी इलाके का। pic.twitter.com/iq4PxZn2Jl — 🇮🇳Delightful🇮🇳 (@sdhruv86) December 13, 2025
या घटनेचा व्हिडिओ @sdhruv86 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेकांनी युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हेच बैल गावांमध्ये पिके नष्ट करत आहेत आणि पाळीव प्राण्यांना मारत आहेत. ही समस्या आता गावातून शहरांपर्यंत पसरली आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लव्ह ट्रँगल केस वाटत आहे, एका गाईवर दोन बैल फिदा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही धरती त्यांचीही आहे, भांडू दे जरा त्यांना”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






