
आकाशातच हवेच्या राक्षसांमध्ये सुरु झाली भयानक फाईट, रोमांचक दृष्यांनी वेधलं युजर्सचं लक्ष; अद्भुत Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या लढाईत आपल्याला दोन गरुड आकाशातच एकमेकांना झुंझ देताना दिसून येतात. खरंतर ही लढाई होत असते माशाच्या तुकड्यासाठी… गरुड आपली शिकार घेऊन पुढे जाणारच असतो तितक्यात मागून एक दुसरा गरुड त्याच्यावर हल्ला करतो. तो तीक्ष्ण नखांनी गरुडाच्या पंजातून त्याची शिकार मिळवण्याचा प्रयत्न करतो. हे दृश्य आकाशात घडणाऱ्या एका हाय-व्होल्टेज ड्रामासारखे वाटते. कोण जिंकणार आणि शिकार कुणाच्या हाती लागणार हा प्रश्न पडत असतानाच दोघांच्याही हातातून तो मासा हेवतून खाली जमिनीवर पडतो आणि दोघांनाही निराशा सहन करावी लागते. व्हिडिओत त्या एका माशासाठी दोन्ही गरुडांनी बरीच मेहनत घेतल्याचे दिसते पण अखेर यात कुणाचाही विजय होत नाही कारण माशा एकाच्याशी वाटेला लागत नाही.
गरुडांच्या शिकारीचा हा व्हिडिओ फोटोग्राफर मुकुल सोमण यांनी काढलेला होता. नॅशनल जिओग्राफिक इंडियाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अलिकडेच याला शेअर केले असून व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत आकाशातील या लढतीवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ते कशावरून भांडत होते?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एकदम अप्रतिम” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असं वाटत आहे की ते आकाशात डान्य करत आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.