
पतीचं ते स्वप्न पत्नीने केलं पूर्ण, पाहता क्षणीच भावुक झाला अन् पुढच्याच क्षणी हंबरडा फोडून रडू लागला; भावनिक Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पत्नीने आपल्या पतीची त्याच्या दिवंगत आईशी भेट करुन दिल्याचे दिसून आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे कसं शक्य आहे. तर तिने ही वास्तविक भेट नसून एक व्हर्च्यूअल भेट होती ज्यात पती आपल्या आईला पाहू शकत होता. व्हिडिओच्या सुरुवातीलाच, माणूस सोफ्यावर बसल्याचे दिसते. यावेळी अचानक तिथे पत्नी येते आणि ती एक व्हीआर बॉक्स पतीच्या डोळ्यांवर लावते. व्हीआर सुरू होताच, तो एका आभासी दुनियेत पोहचतो जिथे त्याची आपल्या दिवंगत आईशी भेट होते. तिथे ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ लिहिलेला एक दरवाजा दिसतो. नंतर, जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा त्याला त्याच्या आईची प्रतिमा दिसते. आईला इतक्या जवळ पाहून, पतीला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि तो रडतच तिच्या जवळ जातो.
व्हिडिओमध्ये व्हिर्च्यूअल दुनियेत आई हात पुढे करत येताना दिसते, ज्यानंतर मुलगा तिला मिठी मारतो. हे दृश्य कुणालाही भावुक करण्यासारखे आहेत. आपल्या मनात दडलेल्या भावना पतीने या भेटीत व्यक्त केल्या. तो रडला पण त्याच्या दु:खातून तो मुक्त झाला. हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मलाही रडू आलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला समजत नाही की लोकांना ही भेट कशी चांगली वाटते..त्याने त्याला दुखावले..भेटवस्तू हास्य आणण्यासाठी असतात…त्याला त्याची आई कधीच परत मिळणार नाही मग त्याला त्याच्या कधीही न संपणाऱ्या वेदनांची आठवण का करून द्यायची…माफ करा पण असे करू नका?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मी आईशिवाय या जगाचा विचारही करू शकत नाही”. हा व्हिडिओ @happytears_vr नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.