(फोटो सौजन्य – Youtube)
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यात एक भारतीय माणूस जपानमधील एका अनोख्या रस्त्याचे वर्णन करताना दिसतो. रस्त्याची माहिती देताना तो स्पष्ट करतो की, यावरुन वाहने जाताच एक मधुर संगीत ऐकू येते. तो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचे आवाहन करतो आणि खरोखरंच जेव्हा समोरुन एक गाडी रस्त्यावरुन जाते तेव्हा त्यातून एक सुंदर गाणं बाहेर पडतं. या रस्त्यावरुन कोणतीही गाडी गेली की त्यातून मधुर संगीत बाहेर पडतं जे खरोखर मंत्रमुग्ध करणारं आहे. हे दृश्य पाहून फक्त व्यक्तीच नाही पाहणारे यूजर्सही अवाक् झाले.
व्हिडिओत दिसणारे हे दृश्य कोणता जादू नसून ती तंत्रज्ञानाची कमाल आहे. जपानमधील काही रस्ते अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की जेव्हा वाहन एका विशिष्ट वेगाने प्रवास करते तेव्हा टायर आणि रस्त्यातील घर्षण संगीतमय आवाज निर्माण करते. यूजर्स हे दृश्य पाहून खूप खुश झाले असून अनेकांनी या अनोख्या तंत्रज्ञानाचे काैतुक केले आहे तर काहींनी असे रस्ते आपल्या देशातही असावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
हा व्हिडिओ @MonkeyxMagic नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, हे खरोखरच एक उत्कृष्ट आहे, त्यांनी रस्त्यावरच संगीत तयार केले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “विचार करतात भारतात ट्रॅफिकमध्ये जर हा रोड असता तर काय झालं असतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जपानचा विकास कल्पनेपलीकडे आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






