(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये महिला आपला अनुभव शेअर करताना दिसते. ती सांगते की, रॅपिडो कॅब ड्रायव्हरने त्या महिलेला अतिशय वाईट वागणूक दिली. त्याने तिला गंतव्यस्थानापर्यंत पोहचवण्याआधीच भररस्त्यात गाडीतून बाहेर निघायला सांगितल आणि महिलेने जेव्हा असं करण्यास नकार दिला तेव्हा तो तिला शिवीगाळ करु लागला. रात्रीच्या अंधारात ऑफिसवरुन घरी परतताना महिलेसोबत हा प्रकार घडला.
महिलेच्या म्हणण्यानुसार, गाडीमध्ये फार मोठ्या आवाजात गाणे वाजत होते. तिने ड्रायव्हरला दोनदा आवाज कमी करण्यास सांगितले, पण त्याने ते ऐकले नाही. तिसऱ्यांदा जेव्हा तिने पुन्हा म्युझिक कमी करण्यास सांगितले, तेव्हा ड्रायव्हरला राग अनावर झाला. ड्रायव्हरने महिलेला अपशब्द वापरत सांगितले, “तुझ्या बापाची गाडी आहे का? फोनवर बोलायचे असेल तर उतर माझ्या गाडीतून आणि जाऊन आपल्या बापाच्या गाडीत बस.” महिलेने सांगितले की, जेव्हा तिने दुसरी कॅब येईपर्यंत तिला गाडीतच थांबण्याची विनंती केला तेव्हा ड्रायव्हरने ‘आता तू पाहा’ म्हणत अचानक गाडी पळवली. यानंतर कशीबशी गाडी थांबवत ती यातून बाहेर निघाली.
महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा ती पोलिस ठाण्यत तक्रार दाखल करायला गेली तेव्हा पोलिसांनी तक्रार दाखल करण्याऐवजी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तिने डिस्ट्रिक्ट कोर्टात ड्रायव्हर विरोधात केस दाखल केल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @stargirl_on_the_go नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुमच्या धाडसाला सलाम” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कधीही एकतर्फी कथेवर विश्वास ठेवू नये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “माझ्यासोबतही असं घडलं होत पण मी त्यावेळी धाडस दाखवलं नाही कारण त्यावेळी माझ्यासोबत माझी मुले होती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






