बिल्डिंगच्या खोलीत राहण्यासाठी तरुण देतो फक्त 15 रुपये भाडे, फोटो शेअर करताच सर्व झाले चकित
आजकाल भाड्याचे घर मिळवणेदेखील फार कठीण बनले आहे. जेव्हा भाडे आपल्याला अनुकूल असते तेव्हा आपल्याकडे घर नसते आणि जेव्हा आपल्याला घर आवडते तेव्हा भाडे इतके जास्त असते की ते आपल्याला ते परवडत नाही. पदवीधरांना भाड्याने घर मिळणे आणखीन कठीण आहे, कारण त्यांना घर परवडेल इतका पगार त्यांना मिळत नाही. अलीकडे, जेव्हा एका बॅचलरने सोशल मीडियावर त्याच्या 1 रूमच्या घराचा फोटो शेअर केला तेव्हा लोकांना धक्काच बसला. कारण या घराचे भाडे फक्त 15 रुपये आहे.
आजच्या महागाईच्या युगात घर म्हटलं घर घेणं काही सोपी गोष्ट नाही. अशात अनेकजण भाड्याचे घर घेणे पसंत करतात मात्र भाड्याचे घरदेखील आजकाल फार महाग असते. अशात 15 रुपयांच्या या खोलीचा फोटो पाहताच आता अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. मनीष अमन हा ट्विटर युजर आहे, तो बिहारचा रहिवासी आहे. अलीकडेच त्याने काही फोटो शेअर केले आहेत, जे तो राहत असलेल्या खोलीतील आहेत. त्याच्या एका खोलीच्या घराचे भाडे फक्त 15 रुपये आहे.
हेदेखील वाचा – दारूच्या नशेत बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर अजगराने घातला विळखा, क्षणार्धात डाव पलटला अन् … Video Viral
आजच्या काळात तुम्हाला 15 रुपयांना काय मिळेल? लोक जेव्हा आपला फोनमध्ये टॉपअप जरी मारायचा असला तरी 15 रुपयांहुन अधिक पैसे आकारले जातात, परंतु इथे तर हा तरुण एका घरात राहण्याचे 15 रुपये भाडे भरत आहे. तरुणाचे घर इतके स्वस्त आहे की याचे फोटो शेअर करताच ते वेगाने व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत.
इतके स्वस्त घर का आहे ?
चला तुमचे आश्चर्य दूर कारुयाय आणि मुलाची खोली इतकी स्वस्त कशी मिळते ते जाणून घेऊयात. वास्तविक, हा मुलगा बंगालच्या एम्स कल्याणी येथे डॉक्टरचे शिक्षण घेत आहे. या सरकारी खोल्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. त्यामुळे भाडे खूपच कमी आहे. खोलीचा आकार एका व्यक्तीसाठी योग्य आहे आणि त्यात संलग्न बाथरूम देखील आहे. मुलाने त्याच्या सर्व आवश्यक गोष्टी खोलीतच ठेवल्या आहेत. मनीषने रुमचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
I got this single room with attached washroom at a cost of ₹15 per month pic.twitter.com/irSYZ7vAaS
— Manish Aman (@manish__aman) October 13, 2024
हेदेखील वाचा – धक्कादायक! चालता चलता महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी अन् … Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप
Here’s short video of my room! pic.twitter.com/VGJmbm6TwI
— Manish Aman (@manish__aman) October 13, 2024
या रूमचे फोटो @manish__aman नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोजच्या कॅप्शनमध्ये तरुणाने, मला अटॅच वॉशरूम असलेली ही सिंगल रूम दरमहा ₹15 मध्ये मिळाली आहे असे लिहिले आहे. या पोस्टला 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. पोस्टवर अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का? ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गोरेगाव-मुंबईमध्ये तर 12 हजाराच्या खाली रूम मिळणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “15,000 रुपयांना दरमहा रूममेट ठेवणे फायदेशीर ठरेल”.