
Christams Hairstyle Video
एक हेअरस्टाईल व्यक्तीचे पूर्ण रुप बदलून टाकते. वेण्या, बन, आणि हेअरकलरिंग अशा वेगवेगळ्या स्टाईल्स मूली करतात. पण आजकाल यासाठी लोक कधी काय करतील याचाही आता नेम राहिलेला नाही. जेव्हा पण आपण कोणत्या कार्यक्रमासाठी तयार होतो, खास करुन मुली तयार होतात. तेव्हा एखादी हेअरस्टाईल केल्याशिवाय आपला लूक पूर्ण होत नाही. यावेळी एका मुलीने खास क्रिसमसाठी खास डोक्यावरच क्रिसमस ट्री तयार करुन घेतला आहे. अगदी डोक्यात तिने लाईटिंगच्या माळ्याही लावल्या आहे. क्रीसमस ट्रीवरील छोटे स्टार, बॉल डोक्यात लावले आहेत. एका बाटलीच्या मदतीने ही हेअरस्टाईल या तरुणीने केली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी याल मजेशीर अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचे हसून आवरणे कठीण जाईल.
ऑटो नाही OYOचं! धावत्या रिक्षात जोडप्याचे अश्लील चाळे; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटपऑर्म इन्स्टाग्रामवर @nagmahairstely या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर अशा कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने क्रीसमस स्री असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने या वर्षी मी पण असाच क्रीसमस ट्री घेऊ शकते असे म्हणत रडणारे इमोजी शेअर केले आहे. आणखी काहींनी उपहात्मक टीप्पणी करत व्हेरी क्रीएटीव्ह अशी कमेंट केली आहे, तर काहींनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. @nagmahairstely तसेच या पेजवर तुम्हाला यांसारखे अनेक इतर भन्नाट भन्नाट हेअरस्टाईल्सही पाहायला मिळतील.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.