
Funny Viral Video
सध्या असाच एक गोंडस गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन चिमुरड्यांनी जयमालेच्या वेळी मोठी गडबड केली आहे. घडलं असे की जयमालेच्या वेळी दोन लहान मुले वरमाला घेऊन स्टेजवर नवरा-नवरी पाशी जाणार होते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की हे एक डेस्टिनेशन वेडिंग आहे. वधू-वरासाठी छान असे स्टेज मोकळ्या वातावरणात तयार करण्यात आले आहे. स्टेजवर गुलाबांच्या फुलाच्या पाकळ्या टाकण्यात आलेल्या. येथे नवरा-नवरी जयमालेसाठी उभे आहेत. याच वेळी दोन चिमुकली हार घेऊन त्यांच्यापाशी येतात. पण तो हा वधू-वराच्या हातता देण्याऐवजी तेच दोघांना घालतात. हे दृश्य पाहून पाहुण्यांमध्ये हास्याचा स्फोट झाला आहे. नवरा-नवरी देखील गोंधळले आहेत. यानंतर त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळण्यात आला आहेत.
व्हायरल व्हिडिओ
WATCH | Varmala ritual goes wrong at cross-cultural wedding, leaves bride and groom confused. pic.twitter.com/BvnrJsRABf — The Tatva (@thetatvaindia) January 12, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @thetatvaindia या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने ही आतापर्यंतची सगळ्यात गोंडस चुक असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने अरे ती त्यांचीच मुले आहेत असे म्हटले आहे. तर आणखी एकाने अरेरे करत शॉकिंग इमोजी शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.