(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक माणूस बोटीच्या काठावर उभा राहून पाण्यात उडी मारताना दिसून येतो. आजूबाजूचा परिसर स्पष्टपणे दर्शवितो की हा परिसर मगरींसाठी ओळखला जातो, परंतु तो माणूस घाबरलेला दिसत नाही. तो खेळकर मूडमध्ये असल्याचे दिसून येते, तो कॅमेरासमोर स्टंट करत तलावात उडी मारतो. पण काही सेकंदातच सर्व दृश्य पलटते, संपूर्ण कथेला धोकादायक वळण मिळते आणि लगेचच पाण्यात मगर व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी त्याचा पाठलाग करताना दिसून येते.
व्हिडिओतील मजेशीर दृश्य धोकादायक वातावरणात बदलते आणि तरुण घाबरतच दुसऱ्याच क्षणी पाण्यातून धावत पळत बोटीच्या दिशेने धाव घेतो. व्हिडिओमध्ये त्याच्या किंकाळ्या स्पष्टपणे ऐकू येतात. परिस्थिती इतकी भयानक बनते की तो माणूस मागे वळून न पाहता पूर्ण वेगाने पोहत बोटीकडे जातो. सुदैवाने, मगर जास्त जवळ नसल्याने व्यक्तीचा जीव वाचतो आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. व्यक्तीच्या या व्हिडिओने फक्त त्यालाच नाही तर युजर्सनाही धडकी भरवली. अनेकदा आपण व्हायरल होण्याच्या नादात नको ते करायला जातो पण असं करताना स्वतःच्या जिवाचीही तितकीच काळजी घेतली पाहिजे, कारण आपला जीव इतकाची स्वस्त नाही की एका रीलसाठी त्याचा बळी द्यावा…
⚠️ Mind-blowing and Horrible: A guy dives straight into the water to catch fish with his bare hands like an absolute legend… but unbeknownst to him, a huge crocodile is creeping up right behind! Looks insanely real, not AI. Nature’s wild side. Watch if you dare! VC:… pic.twitter.com/7q44T9Q1pw — ಸನಾತನ (𑀲𑀦𑀸𑀢𑀦) (@sanatan_kannada) January 6, 2026
हा व्हिडिओ @sanatan_kannada नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे देवा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तरुणाला मगरीच अन्न बनायचं होत असे दिसते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मगर त्याला पाहून जास्तच खुश झाली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






